‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (रामराज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. गुरुदेवांच्या देवघरात सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे ठेवलेली आहेत. देवघरातील देवतांना ते प्रतिदिन भक्तीपूर्ण प्रार्थना करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवता गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) साहाय्य करतात. गुरुदेवांमधील भक्तीमुळे त्यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांत सूक्ष्मातून पालट होत आहेत. देवतांच्या चित्रांतील अनुभूतीजन्य स्पंदने, सगुण/ निर्गुण तत्त्व, तारक / मारक तत्त्व यांच्या प्रमाणातही पालट होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील श्रीरामाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाले आहेत. हे पालट अभ्यासण्यासाठी गुरुदेवांच्या देवघरातील श्रीरामाच्या मार्च २०२६ मधील चित्राचे आणि तुलनेसाठी म्हणून त्यापूर्वीच्या चित्राचे (नोव्हेंबर २०२५ मधील श्रीरामाच्या चित्राचे) लोलकाने परीक्षण (टीप १) करण्यात आले. या चित्रांतील अनुभूतीजन्य स्पंदने, सगुण/ निर्गुण तत्त्व, तारक / मारक तत्त्व यांचे प्रमाण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून काढले आहे. या चित्रांच्या नोंदी आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

टीप १ – लोलकाने केलेले परीक्षण : लोलकाने केलेल्या परीक्षणाद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. लोलकाने परीक्षण करण्यासाठी ज्याचे परीक्षण करायचे तो घटक किंवा त्याचे छायाचित्र, लोलक आणि काही तक्ते यांची आवश्यकता असते. लोलकाने परीक्षण करणारी व्यक्ती सर्वप्रथम इष्टदेवतेला ‘माझ्याभोवती आणि लोलकाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊ दे’ अशी प्रार्थना करते. त्यानंतर ती लोलकाला पुढील २ प्रश्न विचारते.

१. मी लोलकाने परीक्षण करू शकते का ?
२. लोलकाने परीक्षण करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य आहे का ?
लोलकाने दोन्ही प्रश्नांना होकार दर्शविल्यावर व्यक्ती लोलकाने परीक्षण करण्यास आरंभ करते. लोलकाने परीक्षण करणारी व्यक्ती घटकासमोर किंवा घटकाच्या छायाचित्रासमोर लोलक धरून विविध प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विविध प्रकारचे तक्ते उपयोग आणले जातात, उदा. ‘हो’ आणि ‘नाही’ यांचा तक्ता; ‘मीटर’ आणि ‘किलोमीटर’ यांचा तक्ता; आकड्यांचे तक्ते, उदा. १ ते १० आकड्यांचा तक्ता; ५,१०,५०,१०० इत्यादी संख्यांच्या पटीतील आकड्यांचे तक्ते इत्यादी. या तक्त्यांचा उपयोग करून कोणत्याही घटकातील नकारात्मक किंवा/आणि सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येते. लोलकाद्वारे परीक्षण पूर्ण झाल्यावर व्यक्ती इष्टदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

लोलकाने परीक्षण करून अन्य गोष्टींविषयीही माहिती मिळू शकते, उदा. एखाद्या घटकातील त्रिगुणांचे (सत्त्व, रज आणि तम यांचे) प्रमाण, स्पंदनांचा प्रकार (सगुण, सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण आणि निर्गुण), पंचतत्त्वांचे (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचे) प्रमाण, अनुभूतीजन्य स्पंदनांचे (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचे) प्रमाण इत्यादी.
अयोध्या येथील राममंदिराचा संकल्प पूर्णत्वास गेल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीतील देवघरात जाणवलेले आध्यात्मिक पालट

‘माझ्या खोलीतील देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या चेहर्यावरील हास्य वाढलेले जाणवते. त्यांच्या चेहर्याकडे बघून आनंद जाणवतो. प.पू. रामानंद महाराज यांच्या छायाचित्रामध्ये त्यांचे ओठ हलतांना दिसतात आणि ‘ते पुटपुटत नामजप करत आहेत,’ असे जाणवते. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राशेजारी असलेल्या प्रभु श्रीरामाच्या चित्राकडे पाहूनपण खूप आनंद जाणवतो आणि त्याच्या चेहर्यावरील हास्य वाढल्याचे जाणवते. अयोध्या येथील राममंदिराचा संकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे हा पालट जाणवत आहे. आता पुढील ध्येय रामराज्य स्थापन करण्याचे आहे आणि त्यासाठी मीही श्रीरामाला प्रार्थना करत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२७.११.२०२५)
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीरामाच्या चित्राच्या केलेल्या नोंदी आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
श्रीरामाच्या चित्राच्या स्पंदनांतील एखादा पालट लगेच लक्षात यावा, यासाठी तो अधोरेखित केला आहे.

या सारणीच्या आधारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीरामाच्या चित्रात नोव्हेंबर २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये झालेले पालट पुढे दिले आहेत.
१ अ. श्रीरामाच्या चित्रातील आध्यात्मिक भावाच्या स्पंदनांचे प्रमाण वाढणे : श्रीरामाच्या नोव्हेंबर २०२५ मधील चित्रात आध्यात्मिक भावाच्या स्पंदनांचे प्रमाण १५ टक्के होते. श्रीरामाच्या मार्च २०२६ मधील चित्रात आध्यात्मिक भावाच्या स्पंदनांचे प्रमाण वाढून ते २० टक्के झाले आहे.
१ आ. श्रीरामाच्या चित्रातील सगुण तत्त्वाचे प्रमाण थोडेसे वाढणे : श्रीरामाच्या नोव्हेंबर २०२५ मधील चित्रात सगुण तत्त्व २५ टक्के होते. श्रीरामाच्या मार्च २०२६ मधील चित्रात सगुण तत्त्व २७ टक्के आहे, म्हणजे चित्रातील सगुण तत्त्वाचे प्रमाण थोडेसे वाढले आहे.
१ इ. श्रीरामाच्या चित्रातील तारक तत्त्वाचे प्रमाण वाढणे : श्रीरामाच्या नोव्हेंबर २०२५ मधील चित्रात तारक तत्त्व ७५ टक्के होते. श्रीरामाच्या मार्च २०२६ मधील चित्रातील तारक तत्त्व वाढून ते ८० टक्के झाले आहे. देवतेचे तारकरूप आशीर्वादात्मक असते, तर तिचे मारकरूप संरक्षणार्थ कार्यरत असते.
१ ई. श्रीरामाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : श्रीरामाच्या नोव्हेंबर २०२५ मधील चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४३ सहस्र ८०० मीटर होती. श्रीरामाच्या मार्च २०२६ चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ६३ सहस्र ७२० मीटर आहे, म्हणजे तिच्यात १९,९२० मीटरने वाढ झाली आहे.

२. निष्कर्ष
श्रीरामाच्या चित्रातील अनुभूतीजन्य आध्यात्मिक भावाची स्पंदने, सगुण/निर्गुण तत्त्व आणि तारक/मारक तत्त्व यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास केल्यास लक्षात येते की, श्रीरामाच्या चित्रातील आध्यात्मिक भावाच्या स्पंदनांचे प्रमाण, सगुण तत्त्व आणि तारक तत्त्व यांचे प्रमाण वाढल्यामुळे चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही पुष्कळ वाढली आहे.
सध्याचा काळ हा रामराज्य स्थापन करण्यासाठी कार्यरत होण्याचा काळ आहे. त्यामुळे श्रीरामाच्या चित्रातील सगुण स्पंदने थोड्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच रामराज्य स्थापन करणे, हे भगवंताच्या अधिष्ठानाविना शक्य नाही. त्यासाठी आध्यात्मिक भावाची जोड देणे आवश्यक आहे. साधकाच्या मनातील भाव वृद्धींगत होण्यासाठी श्रीरामाने त्याच्या चित्रातील आध्यात्मिक भावाच्या स्पंदनांमध्ये वाढ केली आहे. ‘श्रीरामाचे चित्र बघून साधकाचा भाव जागृत व्हावा’, हा त्याचा उद्देश आहे. साधकांना रामराज्य स्थापन करण्याच्या कार्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी श्रीरामाने त्याच्या चित्रातील तारक तत्त्व वाढवले आहे.
गुरुदेवांच्या देवघरातील श्रीरामाच्या चित्रात झालेले हे वैशिष्ट्यपूर्ण पालट रामराज्याच्या स्थापनेसाठी श्रीरामाचे तत्त्व अधिकाधिक कार्यरत होत असल्याचे दर्शक आहेत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.३.२०२६)
|
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !