|

वॉशिंग्टन (अमेरिका) – वर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हत्या, बलात्कार आणि अत्याचार केले, ज्यांना वंशसंहार आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे मानले पाहिजे, असा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. खासदार ग्रेग लँड्समन यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. या काळात ३० लाखांहून अधिक लोक मारले गेले, तर २ लाखांहून अधिक महिलांवर अत्याचार झाले आणि कोट्यवधी लोक बेघर झाले.

‘जमात-ए-इस्लामी’सारख्या गटांविरुद्ध कारवाई करा !
या प्रस्तावात म्हटले आहे की, बंगाली हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. तसेच जमात-ए-इस्लामी सारख्या गटांविरुद्ध कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आवाहन करण्यात आले आहे की, या घटनांना अधिकृतपणे स्वीकारावे आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे.
संपादकीय भूमिकायात हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला, तर लाखो हिंदूंनी भारतात पलायन केले होते; मात्र भारताने अद्यापही याला ‘हिंदूंचा वंशसंहार’ म्हटलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे ! त्या दृष्टीने अमेरिकेतील खासदार ५५ वर्षांनंतर त्याच्या देशाकडे अशा प्रकारची मागणी करतो, हे भारतासाठी लज्जास्पद आहे ! |
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani