जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल’ पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी सैन्याला दिले आव्हान !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सैन्याने देशाच्या घटनात्मक मर्यादेत राहिले पाहिजे. जर तुम्हाला राजकारण करायचे असेल, तर गणवेश (वर्दी) उतरवून या. निवडणुकांमध्ये भाग घ्या. यावरून हे स्पष्ट होईल की, लोक गणवेशधारी लोकांना किती मते देतात, असे आव्हान ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल’ पक्षाचे प्रमुख मौलाना (इस्लामचे अभ्यासक) फजलुर रहमान यांनी पंजाबच्या कसूर येथे एका सभेला संबोधित करतांना सैन्याला दिले.
बलुचिस्तानमध्ये पाक सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही !
पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर फजलुर रहमान म्हणाले की, देश विखुरला जात आहे. शासक कुठे आहेत ? बलुच भागात बंडखोरी झाली होती. संपूर्ण बलुच भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला होता. आजही तिथे पाकिस्तानी सरकारचे कोणतेही नियंत्रण किंवा शासन नाही. ढासळत चाललेली ही सुरक्षाव्यवस्था आता खैबर पख्तुनख्वापर्यंत पसरली आहे.
देशासाठी हुतात्मा होणारे सैनिक पगार घेतात !
सुरक्षेविषयी ते म्हणाले की, लोक म्हणतात की, आमचे तरुण (सैनिक) हुतात्मा होत आहेत. तुमचे तरुण याच उद्देशाने गणवेश घालतात. त्यांना देशाचे रक्षण करण्यासाठी पगार दिला जातो. तुम्ही तुमच्या रक्ताचे उपकार माझ्यावर का लादत आहात ? तुम्ही आमच्या कष्टातून आणि घामातून मिळवलेल्या करांमधून तुमचा पगार घेत आहात.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता
Kenya Halal certification : केनियामध्ये हलाल प्रमाणपत्रांच्या विरोधात व्यापार्यांची न्यायालयात याचिका