|
((सेक्शुअल) ग्रूमिंग म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांना जाळ्यात ओढून, कुटुंबियांपासून दूर नेऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे)
लंडन (ब्रिटन) – युनायटेड किंगडममध्ये ‘ग्रूमिंग’ टोळीला ‘कौर’ (शीख मुलगी) पासून ‘खान’ (मुसलमान) बनवल्यास १० सहस्र पाऊंड (११ लाख रुपये) दिले जात आहेत. पाकिस्तानी वंशाची ग्रूमिंग टोळी सुनियोजित कटाखाली मुसलमानेतर मुलींना, विशेषतः शीख मुलींना लक्ष्य करत आहे, अशी माहिती इंग्लंडमध्ये रहाणारे पंजाबी नवदीप सिंह यांनी सामाजिक माध्यमांवर एका तरुणीचा व्हिडिओ प्रसारित करून दिली आहे.
🚨 Shocking Report from Britain! 🇬🇧
A video shared by @Navdeep_UK exposes a Pakistani 'grooming gang' targeting Sikh girls with a bounty of £10,000 (around Rs 11 lakh), £5,000 (around Rs 5.5 lakh).for targeting Hindu or Christian girls.
⚠️ The pattern:
Fake love ➡️… pic.twitter.com/Alp5XSyMGr— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2026
शीख तरुणी या व्हिडिओत पुढे सांगते की, ग्रूमिंग टोळी आधी मुलींना लक्ष्य करून त्यांच्याशी भावनिकरित्या जोडली जाते, नंतर त्यांना महागड्या गाड्यांमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये फिरवते अन् जेव्हा मुलगी त्यांच्या जाळ्यात अडकते, तेव्हा तिचे धर्मांतर घडवून आणते. वेगवेगळ्या धर्मांच्या मुलींना फसवण्याचे दरही वेगवेगळे आहेत. शीख मुलीला फसवून मुसलमान बनवल्यास मुसलमान युवकाला १० सहस्र पाऊंड मिळतात. तर हिंदु किंवा ख्रिस्ती मुलीचे धर्मांतर केल्यास ५ सहस्र पाऊंड (सुमारे साडे ५ लाख रुपये) दिले जातात.
एका धर्माचे सर्व लोक वाईट नसतात
तरुणीने असेही सांगितले की, हा व्हिडिओ कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, किंवा कुणाला लक्ष्य करण्यासाठी बनवलेला नाही. एका धर्माचे सर्व लोक वाईट नसतात. काही लोक असे असतात, जे संपूर्ण धर्माला अपकीर्त करतात.
भाजपच्या भारतातील नेत्याचे आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन
भाजपचे पंजाब प्रवक्ते सरचंद सिंह यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आवाहन केले आहे की, या सूत्राला केवळ धार्मिक घटना न मानता महिलांच्या सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित जागतिक सूत्र मानून ते गांभीर्याने घ्यावे.
ग्रूमिंग टोळी कसे काम करते ?
१. लक्ष्य निश्चित करणे : ग्रूमिंग टोळीचे मुसलमान तरुण महाविद्यालये, शॉपिंग मॉल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा मुलींना शोधतात, ज्या भावनिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा ज्यांचे कुटुंबासमवेत थोडे मतभेद चालू आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुसर्या देशांतून शिकायला आलेल्या मुलींना प्राधान्याने लक्ष्य केले जाते.
२. ओळख पालटून खोटी प्रतिमा निर्माण करणे : मुलींची निवड केल्यानंतर मुसलमान तरुण स्वतःचे नाव मुलीच्या धर्मानुसार ठेवतात. ते स्वतःला खूप श्रीमंत आणि उदारमतवादी दाखवून मुलीशी मैत्री करतात. ते महागड्या गाड्या आणि ब्रँडेड कपड्यांनी मुलीला प्रभावित करतात.
३. रेस्टॉरंट्स आणि मॉल्स येथे फिरवतात : टोळीतील मुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना रेस्टॉरंट्स आणि मॉल्स येथे फिरायला घेऊन जातात. असे करून ते मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
४. प्रेम आणि लक्ष देतात : प्रारंभी मुलीवर इतके प्रेम केले जाते आणि लक्ष दिले जाते की, तिला वाटू लागते की, हाच तिचा खरा प्रियकर आहे. तिला मोठी-मोठी स्वप्ने दाखवली जातात. मुलीला लग्नाचे आमिष दाखवतात.
५. कुटुंबापासून वेगळे करून स्वतःवर अवलंबून ठेवतात : मुसलमान तरुण हळूहळू मुलीच्या मनात तिच्या कुटुंबाबद्दल आणि धर्माबद्दल द्वेष किंवा संशय निर्माण करतात, जेणेकरून ती त्याच्या जवळच्या लोकांपासून दूर होईल अन् पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहील.
६. ब्लॅकमेलिंग आणि शोषण : एकदा मुलगी त्यांच्या जाळ्यात अडकली की, त्यानंतर ते तिचे शारीरिक शोषण करण्यास चालू करतात. तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास चालू करतात.
७. धर्मांतर : मुसलमान तरुण नंतर मुलीला लग्न किंवा सुरक्षेचे कारण देऊन धर्मांतर करण्यास भाग पाडतात. त्यांचे (शीख असल्यास) ‘कौर’ आडनाव पालटून ‘खान’ केले जाते.
संपादकीय भूमिका
|

Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman