सध्या जगभरातील विविध देशांमध्ये आपापसांत युद्ध चालू झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तिसर्या महायुद्धाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान आपण पहात आहोत. ‘३.३.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखमालिकेतील पहिल्या भागात आपण तिसर्या महायुद्धाचे स्वरूप आणि स्तर समजून घेतले. आता या दुसर्या भागात आपण तिसर्या महायुद्धाच्या काळात पालट होण्यामागील कारणे जाणून घेणार आहोत.

(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014079.html

२ ई ३. साधना करणार्या जिवांना सगुण स्तरावरील युद्धात यश मिळवता येणे : साधना करणारे किंवा न करणारे, या सर्वांनाच स्थुलातील युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. असे असले, तरी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि ‘साधना’ म्हणून युद्ध करणारे जीव यांना सगुण स्तरावरील युद्धात यश मिळवता येणार आहे, उदा. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मावळ्यांच्या मनावर हिंदु धर्माचे तत्त्व आणि नियम यांनुसार ‘अन्यायी मोगल सत्तेविरुद्ध युद्ध करणे’, हेच श्रेष्ठ आचरण आहे , असा संस्कार केला होता, उदा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मावळ्यांना ‘अन्यायी मोगल सत्तेविरुद्ध युद्ध करणे’ योग्य असले, तरी त्यासाठी मोगलांप्रमाणे हीन पातळीवर न जाता हिंदु धर्माचे तत्त्व आणि नियम यांनुसार संघर्ष करण्याची प्रेरणा दिली, उदा. मोगल हिंदु राजांना युद्धात हरवायचे आणि त्यांच्या स्त्रिया भेट म्हणून मोगल राजाला द्यायचे.

एकदा मावळ्यांनी कल्याणच्या मोगल सुभेदाराला हरवून त्याची सून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी भेट म्हणून आणली होती. त्या वेळी महाराजांनी तिला भेटवस्तू म्हणून न स्वीकारता तिचा सन्मान केला आणि तिच्या सासरी परत पाठवले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना वेळोवेळी योग्य आचरणाची शिकवण दिल्यामुळे अनेक मावळ्यांचा काही प्रमाणात मनोलय झाला आणि अन्यायी मोगल सत्तेविरुद्ध युद्ध करण्याच्या माध्यमातून त्यांची साधना झाली. बाजीप्रभु देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे यांसारख्या अनेक मावळ्यांनी काळ आणि क्षमता यांनुसार आवश्यक अशी युद्धकला आत्मसात करून अत्याचारी मोगल सत्तेविरुद्ध बंड केले अन् बहुतांश वेळी विजयही मिळवला. याउलट त्या काळातील अन्य राजांनी मोगल सत्तेविरुद्ध बंड केले; पण त्यांना ‘युद्ध करणे’, ही साधना आहे’, हा साधनेचा पाया आणि प्रत्यक्ष कृती यांच्या संदर्भात संतांचे मार्गदर्शन नसल्याने त्यांचा दारूण पराभव झाला अन् त्यांचे राज्य मोगलांनी बळकावले.
त्याप्रमाणे तिसर्या महायुद्धाच्या काळात ‘चुकीच्या कृतींच्या संदर्भातील आंदोलने’, ‘स्वसंरक्षण’, ‘प्रथमोपचार’, ‘अग्नीशमन’, ‘घरगुती लागवड’ इत्यादी जीवनोपयोगी कृती आत्मसात् करून संतांच्या मार्गदर्शनानुसार कृती करणार्यांना सगुण स्तरावरील युद्धामुळे निर्माण झालेली विविध संकटे आणि त्रास यांवर मात करता येईल. याउलट विविध विषयांमध्ये तज्ञ असूनही स्वतःच्या मनाने प्रयत्न करणार्यांचा दारूण पराभव होऊन त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागेल.’
३. तिसर्या महायुद्धाचा कालावधी आणि महायुद्धाच्या टप्प्यांनुसार त्याची लक्षणे

(क्रमश:)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २८.९.२०२५, वेळ रात्री ९.०५ आणि एकूण कालावधी २ मिनिटे)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014923.html
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!