संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

  • गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

  • गुरुस्तवन भावांजली

‘अध्यात्मात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आणि शब्दातीत आहे. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसून ते साधकाच्या भवसागरातील नौकेचे सुकाणू आहेत. साधकाच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून त्याला ईश्वरी प्रकाशाकडे नेणारी दिव्य शक्ती म्हणजे ‘गुरु’ ! गुरूंच्या या अगाध महिम्याचे आणि श्रेष्ठत्वाचे वर्णन संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अतिशय भावपूर्ण शब्दांत केले आहे. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२९.७.२०२६ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात लाभलेल्या अवतारी गुरूंची गुरुपौर्णिमा साजरी करणे, म्हणजे परब्रह्मस्वरूप भगवंताशी अद्वैत असलेल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय ! या दिव्य पर्वात साधकांचा श्री गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव आणखी जागृत होण्यासाठी त्यांना एक अनुपमेय संधी लाभत आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘गुरुस्तवन भावांजली’ हे विशेष सदर २३.७.२०२६ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

या सदरातून ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !’ आपल्याला अवगत होणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गुरुभक्तीपूर्ण शब्दांमुळे साधकांमधील गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होईल.

साक्षात् परब्रह्मस्वरूप असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कितीही वर्णन केले, तरीही ते अपुरे आहे. त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागतीने नतमस्तक होणे, एवढेच आपल्या हातात आहे. त्यांच्या गुणांची आणि कृपाप्रसादाची व्याप्ती अथांग आहे. गुरुपौर्णिमेच्या या सप्ताहात आपल्या अंतःकरणात श्री गुरूंची दिव्य मूर्ती साठवूया. या ‘गुरुस्तवन भावांजली’तील बोधामृताचा अंगीकार करत श्री गुरूंच्या परम मोक्षदायी श्री चरणी संपूर्ण शरण जाऊन त्यांना त्रिवार वंदन करूया !