‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधकांना सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. यातील सूत्रे येथे दिली आहेत.

१. चूक झाल्यावर ती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे आणि स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी उत्तरदायी साधकांना विचारून प्रायश्चित्त घ्यावे !
एक साधक : नमस्कार गुरुदेव, माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत. उत्तरदायी साधक मला ज्या सेवा सांगतात, त्या सेवांचा मला ताण येतो. त्या वेळी या प्रसंगाचे चिंतन करतांनाही मला पुष्कळ ताण येतो आणि मला काही सुचत नाही. त्यामुळे ‘माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत’, असे वाटून मला पुष्कळ निराशा येते.’ तेव्हा मी स्वत:ला शारीरिक त्रास करून घेत होतो जेणेकरून माझे ‘प्रयत्न व्हायला हवे’, ही जाणीव होईल. एवढे करूनही माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत. तेव्हा मला वाईट वाटते, तर मी आणखीन काय प्रयत्न करू ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘एवढे करून होत नाही, म्हणजे तुम्ही करता ते पुरेसे नाही’, असा विचार व्हायला हवा. ‘मी एवढे करतो, तरी झाले नाही’, असे वाटायला नको. एखाद्या गुन्हेगाराने स्वतःहून शिक्षा करून घेतली, तर त्याने स्वतःला शिक्षा घेतली, तर ती पुरेशी आहे का ?’, हे न्यायाधिशांना ठाऊक असते ना ?’, असा विचार ठेवा आणि मुख्यतः विचार करायचाच नाही. ‘चूक लक्षात आली की, ती सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायचे. ‘माझ्या हातून चूक घडली आहे, तर त्यासाठी मी काय करू ?’, असे उत्तरदायी साधकांना विचारायचे. आपण ठरवायचे नाही.
एक साधक : हो गुरुदेव.
२. व्यक्तीच्या चित्तावर साधनेचा संस्कार झाला असेल, तर तिच्या मृत्यूनंतरही तिची साधना चालू रहाते !
दुसरा साधक : गुरुदेव, वर्ष २०२१ मध्ये माझ्या बाबांचे निधन झाले. तो प्रसंग आम्हा सर्वांसाठी फारच कठीण होता; मात्र तुमच्या कृपेने माझ्या मनात पुढील विचार आले, ‘बाबांना देवाज्ञा झाली आहे. हे निसर्गनियमानुसार होते. नंतर ‘माझी आणि निधन झालेल्या व्यक्तीची साधना कशी होईल ?’, याकडे लक्ष द्यायला हवे.’ गुरुदेव, आता गेलेली व्यक्ती साधना करू शकत नाही, तर तिच्यासाठी माझे कर्तव्य काय असते ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगली साधना करणारी व्यक्ती मृत्यूनंतरही पुढील लोकांत (महा, जन, तप अशा कुठल्याही लोकांत) गेली, तरीही त्या व्यक्तीची साधना चालू रहाते. त्या व्यक्तीच्या चित्तावर साधनेचा संस्कार झालेला असतो. त्यामुळे चित्त त्या व्यक्तीला नामजपाची आठवण करून देते.
दुसरा साधक : तेव्हा ‘सगळ्या कुटुंबियांनी नुसते रडत बसण्यापेक्षा किंवा दुःख व्यक्त करण्यापेक्षा निधन झालेल्या व्यक्तीसाठी कर्तव्य म्हणून नामजप करूया’, असा विचार माझ्या मनात होता. त्या वेळी आम्ही देवाच्या कृपेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ९ माळा करत होतो. त्यामुळे त्या १३ दिवसांत आमच्या घरात कसलाही दाब किंवा ताण नव्हता. बाबांचे मृत्यूनंतरचे विधी करत असतांना आमच्यामध्ये कर्तव्याची भावना होती.
आपण समाजात पहातो, ‘घरात कुणाचे निधन झाल्यावर नातेवाईक आक्रोश करतात, शोक करतात.’ त्यापेक्षा त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला, तर घरातील दाब आणि ताण नाहीसा होईल. हे आपण प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देऊ शकलो, तर सगळ्यांना शिकायला मिळेल आणि आपल्यालाही शिकायला मिळेल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुष्कळ छान.
३. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सर्वांनी स्थिर राहून नामजप आणि प्रार्थना करावी !
दुसरा साधक : या माध्यमातून देवाने आम्हाला दुःख विसरण्यास पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे आम्ही या प्रसंगातून लवकर बाहेर आलो. तेव्हा माझ्या मनात ‘घडणार होते, ते घडले. आता आपण पुढे काय करायला पाहिजे ?’, असा विचार प्रामुख्याने होता. आईला रुग्णालयात बाबांचे शेवटचे दर्शन झाले. तेव्हा आईकडून एक चांगली कृती झाली. ती आईच सांगेल.
साधिका (आई) : नमस्कार, शेवटच्या दिवशी मी यजमानांना पहायला त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मला कोणतीच संवेदना जाणवली नाही. मी तेथे गेल्यानंतर त्यांच्या हृदयावर हात ठेवून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ असा १३ वेळा नामजप केला आणि तुम्हाला (गुरुदेवांना) सूक्ष्मातून सांगितले, ‘गुरुदेव, (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आता पुढच्या प्रवासासाठी तुम्हीच त्यांचे बोट धरा. यांना मायेतील कोणताही प्रसंग किंवा नातेवाईक यांमध्ये अडकू देऊ नका.’ तेव्हा मी ‘यजमानांचा पुढचा प्रवास सुखकर होऊ दे’, अशी प्रार्थना केली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही फार छान प्रार्थना केलीत.
साधिका (आई) : त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून १३ दिवस ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला. साधकांनी सांगितल्याप्रमाणे मी अंघोळ झाल्यावर प्रतिदिन नऊ माळा दत्ताचा नामजप करत होते. याचा परिणाम म्हणजे, आमच्या अंगणातील कुंडीत औदुंबराची तीन रोपे आली आहेत. त्याच्या जोडीला एक तुळशीचे रोपही आले आहे. अशा मला अनुभूती आल्या. ही आपली कृपा आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : प्रत्येक व्यक्तीला कुटुंबियांचा मृत्यू होण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. तुमच्या उदाहरणातून सर्वांना शिकायला मिळेल.’
यात काय आश्चर्य !
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?