आदिवासी हिंदु समुदायाची एकता ही राष्ट्राची शक्ती ! – भाजप नेते प्रबल प्रताप जुदेव

सुंदरगड (ओडिशा) – आदिवासी समुदाय भारताचा आधारस्तंभ आहे, म्हणूनच राष्ट्रविरोधी शक्ती आदिवासींना लक्ष्य करतात. आज इंग्रजांना हाकलून लावण्यात आलेले असले, तरी त्यांनी ख्रिस्ती धर्मांतराची बिजे पेरली आहेत, जी आपल्या धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांसाठी सर्वांत मोठा धोका आहे. यासाठी आपण संघटित होऊन या राष्ट्रविरोधी राक्षसी शक्तींविरुद्ध लढले पाहिजे. आदिवासी हिंदु समुदायाची एकता ही राष्ट्राची शक्ती आहे, असे संबोधन भाजपचे छत्तीसगड राज्य उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी केले.

शुद्धी आंदोलनाचे प्रणेते स्वामी श्रद्धानंद यांच्या जयंतीनिमित्त विश्व हिंदु परिषदेने येथील करुआ बहल येथे ‘प्रांतीय आदिवासी धार्मिक संरक्षण महायज्ञा’चे आयोजन केले होते. या वेळी जुदेव यांनी २१० आदिवासी बंधू-भगिनींना वैदिक मंत्रांचा जप करून आणि यज्ञानंतर त्यांचे पाय धुऊन सनातन हिंदु धर्मात परत आणले. (शुद्धी आंदोलन हे स्वामी श्रद्धानंद आणि आर्य समाज यांनी १९२० च्या दशकात चालू केले होते. यांतर्गत सहस्रावधी हिंदूंना ख्रिस्ती धर्मातून हिंदु धर्मांत परत आणण्यात आले होते.)

१. श्री. जुदेव उपस्थितांना संबोधित करतांना पुढे म्हणाले की, स्वामी लक्ष्मणानंदजी यांनी ओडिशातील कंधमलमध्ये आदिवासींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे कट रचणार्या मिशनरी माफियांशी लढा दिला होता. यामुळे त्यांची वर्ष २००८ मध्ये भ्याडपणे हत्या करण्यात आली. आजचा हा स्वदेश प्रवास आम्ही त्या महान संतांना समर्पित करतो, ज्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्राण अर्पण केले.

२. कार्यक्रमासंदर्भात श्री. जुदेव यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले की, आदिवासी समुदायाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे रक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्र आणि धर्म यांप्रती समर्पणाचे असे कार्यक्रम एक शक्तीशाली उदाहरण आहे.

३. या प्रसंगी विहिंपचे राज्य कार्यकारी प्रमुख अशोक गांधी, केंद्रीय सहमंत्री अच्युत नंदकर, दिलीप मेहेर (विहिंप, सुंदरगड), करनेल सिंह (विहिंप, जशपूर), परमानंद बाग, अनिल कुमार संतुक (विहिंप, ओडिशा) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
पुणे येथील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्या पती-पत्नीवर गुन्हा नोंद