|

चिपळूण, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील नारायण तलाव परिसरात ३० जानेवारी २०२६ या दिवशी मुसलमानांनी नमाजपठण केले होते. या विरोधात आक्षेप घेत हिंदुत्वनिष्ठांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली होती. सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यासारख्या संवेदनशील विषयावर १६ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेली नव्हती. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांच्याकडे या गंभीर विषयावर सतत पाठपुरावा करूनही साधा गुन्हाही नोंदवण्यात आला नाही. (हेच जर मुसलमानांविषयी घडले असते, तर पोलीस गप्प बसले असते का ? आतापर्यंत हिंदूंवर गुन्हा नोंदवून अटकसत्र चालू केले असते ! – संपादक)
Chiplun, Maharashtra: Delay by Municipal Council in filing a complaint over the Narayan Talav Namaz issue has angered Hindu groups.
On such a sensitive matter, why the silence and delay?Inefficiency or pressure?
When administration fails to act swiftly, public protests become… pic.twitter.com/P1sGQHDATV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2026
१. कमालीची दिरंगाई होत असल्याने १६ फेब्रुवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी नगर परिषद प्रशासनाकडे याबद्दल जाब विचारला असता प्रशासन पोलिसांवर दिरंगाईचे कारण ढकलत होते.
२. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना चिपळूण पोलीस ठाण्यातील अधिकार्याशी बोलण्यास सांगितले. तेव्हा नगर परिषदेला याविषयी तक्रार करण्यासाठीचे पत्र गुरुवारी, १२ फेब्रुवारीला दिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर या पत्राची शोधाशोध मुख्याधिकारी करत होते, हे पाहिल्यावर हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये संताप निर्माण झाला.
![]() हे ही वाचा → चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधांकडून चाचपणी आणि हिंदुत्वनिष्ठांची प्रखर चेतावणी ! |
३. समाजातून या प्रकरणाविषयी एवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली असतांनाही ‘नगर परिषदेच्या वतीने तक्रार न करणे, हे हिंदूंच्या भावनांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न आहे’, असे प्रतिनिधींनी या वेळी सुनावले.
४. नगर परिषद उद्यान विभागाचे उत्तरदायी कर्मचारी श्री. बापू साडविलकर यांना सोबत घेऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात ही तक्रार १६ फेब्रुवारी या दिवशी नोंदवून घेण्याचा स्वतः उपस्थित राहून पाठपुरावा केला.
५. या वेळी नगरसेवक निहार कोवळे यांनी मुख्याधिकार्यांना या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाच्या या वेळकाढू कार्यपद्धतीबद्दल विचारणा केली. ‘यात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ?’, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
६. सदर प्रकरणी पोलिसांनीही नगर परिषद अधिकार्याच्या हाती त्यांचे पत्र थेट न देता ते केवळ आवक (इन्वर्ड) केले. त्यामुळेही गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया लांबली, असेही निदर्शनास येत आहे. याविषयी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या असंवेदनशीलतेविषयी चिपळूण शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे.
७. ही तक्रार प्रविष्ट करण्यासाठी आणि त्याविषयी पाठपुरावा करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजिंक्य ओतारी, सकल हिंदु समाज संघटनेचे श्री. राजेश ओतारी, गोरक्षक श्री. विक्रम जोशी, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. आदित्य जोशी, शिवसेना गुहागर विधानसभा निरीक्षक श्री. अनुराग उतेकर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री अमित जोशी, प्रशांत उतेकर, संदीप खरे आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|

Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !