चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधांकडून चाचपणी आणि हिंदुत्वनिष्ठांची प्रखर चेतावणी !

चिपळूण येथील ऐतिहासिक महत्त्व असणारे स्थळ, म्हणजे नारायण तलाव ! भगवान परशुरामाने कोकणभूमीची निर्मिती केल्यानंतर चिपळूण परिसरात ६० तलाव बांधले, त्यांपैकीच एक हा नारायण तलाव मानला जातो. सद्य:स्थितीत हा तलाव चिपळूण नगर परिषदेच्या अखत्यारीत असून प्रशासनाने पर्यटनासाठी तो विकसित केला आहे. या तलावाचे दीड वर्षापूर्वीच सुशोभिकरण करून त्याचा थाटामाटात लोकार्पण सोहळा १८ ऑगस्ट २०२४ या दिवशी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला होता.  

चिपळूण येथील नारायण तलाव

प्रशासनाचा या तलावाकडे पर्यटक येण्याचा उद्देश असल्याने साहजिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘राज्य तलाव संरक्षण योजने’च्या अंतर्गत नारायण तलावाच्या संवर्धनासाठी सुशोभिकरण आणि स्वच्छता यांची कामे केली. या तलावाच्या आजूबाजूला हिरवळ, उद्यान आणि सुशोभिकरण केले. साहजिकच दूरून पर्यटक आले किंवा आले नाही; मात्र चिपळूणमधील काही जण संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी येथे येऊ लागले.

१. सार्वजनिक स्थळी बुरखेवाल्यांची वाढती गर्दी चिंतनीय !

आता अशी मोकळी जागा मिळाल्यानंतर ज्यांना फिरण्यासाठी कुठे जागा नसते, म्हणजे हिंदूंना मंदिरे असतात किंवा अन्य ठिकाणी फिरण्यासाठी जाता येते, तसे मात्र बुरखेवाल्यांना मशिदीत वगैरे जाता येत नाही, म्हणजे मुसलमान त्यांना तशी व्यवस्थाच करून देत नाहीत, त्यामुळे त्या अशा मोकळ्या जागा निवडतात आणि आपल्या ४-५ मुलांना घेऊन फिरायला येतात. आता नारायण तलावाचेही तेच झाले. येथे सकाळी-संध्याकाळ फिरण्यासाठी थोडे फार हिंदु दांपत्य; मात्र या बुरखेवाल्यांची गर्दीच अधिक उठून दिसणारी ! अशी गर्दी कोकणवासियांना नवीन नाही. आता रत्नागिरी, दापोली समुद्रकिनार्‍यांवर अशी सर्वत्रच बुरखावाल्यांची गर्दी वाढलेली दिसते. याच उद्यानाबाहेर त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी फुगे विकणाराही यांचाच असतो आणि हाच सर्व येणार्‍या-जाणार्‍यांवरही लक्ष ठेवतो. केवळ ५-६ मासांतच ही परिस्थिती पालटते आणि याच तलावाच्या परिसरात नमाजपठण केल्याची घटना घडली. यातूनच मुसलमानांची मानसिकता लपत नाही आणि त्यांचा उद्देशही स्पष्ट होतो.

सामाजिक माध्यमांसमोर बोलतांना श्री. निहार कोवळे

२. सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाचा प्रयोग

खरेतर अशा सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणे, हे मुसलमानांच्या दृष्टीने नवीन मुळीच नाही. त्यांचा एक मार्गी तो उद्योग आणि प्रयोगही असतो. कोण कुणी किती बोलतो ? याच्यावर त्यांची पुढील चाल अवलंबून असते. ‘चिपळूणमधील हा प्रयोग आतातरी अयशस्वी झाला’, असे तूर्तास तरी म्हणता येऊ शकते, याचे कारण, म्हणजे येथील हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन केलेला निषेध आणि प्रशासनाला दिलेली चेतावणी !

जागृत हिंदूंसह शिवसेनेचे नगरसेवक निहार कोवळे यांची चेतावणी !

श्री. निहार कोवळे

शिवसेनेचे नगरसेवक श्री. निहार कोवळे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या नमाजपठणाला जोरदार विरोध केला आणि चेतावणीही दिली आहे. श्री. निहार कोवळे म्हणतात, ‘‘खरेतर आपल्यावर एकत्र यायची वेळ यायला नको; पण जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा आम्ही सगळे एकवटू शकतो, हे दाखवण्यासाठी आपण जमलो आहोत. शुक्रवारी, ३० जानेवारीला सरकारच्या भाषेत एका विशिष्ट समाजाने; पण आम्ही आमच्या भाषेत सांगतो, मुसलमान समाजाने नारायण तलाव परिसरात नमाजपठण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या या गोष्टीवर क्रियेला प्रतिक्रिया यायलाच पाहिजे. पहिली वेळ असल्याने आम्हीही सामोपचाराने घेत आहोत. मी नगरसेवक असलो, तरी मी पहिला हिंदुत्वनिष्ठ आहे आणि म्हणूनच प्रथम मी लोकांसमवेत आहे. (किती लोकप्रतिनिधी असे बोलण्याचे धाडस करतात ? – संपादक) प्रशासनाला विनंती केली आहे आणि नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे. त्यांना तेथील ‘व्हिडिओही’ दाखवलेले आहेत. नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून नमाजपठण करणारे जे कोण आहेत, त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यासाठी भाग पाडले जाईल. ती कारवाई काय केली जाईल, त्याचीही माहिती आपल्याला दिली जाणार आहे. याचे उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही शांत बसणार नाही. आपल्याच करातून सार्वजनिक ठिकाणी व्यय केला जातो. त्यामुळे अशा घटना सार्वजनिक ठिकाणी घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे दायित्व प्रत्येक चिपळूणकरांचे आहे.’’

– श्री. संतोष गांधी

३. यापुढे क्रियेला प्रतिक्रियेची चेतावणी !

‘पुढच्या वेळी पुन्हा अशी घटना घडल्यास आम्ही संघटित होऊन निवेदन देण्याचे काम करणार नाही. असा प्रयत्न करणारी जे कोण लोक आहेत, ते आम्हाला अजमावून बघण्याचे काम करत आहेत. ही ‘लिटमस टेस्ट’ (निर्णायक चाचणी) आहे. आम्ही चेतावणी देतो, तुम्ही आमची ‘लिटमस’ परीक्षा घेणार असाल, तर आमचीही तेवढीच सिद्धता आहे. यापुढे क्रियेला प्रतिक्रिया १०० टक्के येणारच’, अशीही चेतावणी श्री. निहार कोवळे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी दिली आहे.

४. हिंदूंचा सनदशीर मार्गाने विरोध

तलाव परिसरात मुसलमानांकडून प्रशासनाची कोणतीही अनुमती न घेता नमाजपठण केल्यामुळे शांतता बिघडवण्याच्या प्रयत्न केल्याविषयी हिंदुत्वनिष्ठांकडून चिपळूण नगर परिषदेकडे तक्रार करण्यात आली. रात्रीच्या वेळी या परिसरात काही संशयास्पद हालचाली वाढल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. तलाव परिसरात परिषदेचे सुरक्षारक्षक असतांनाही हा प्रकार कसा घडला, याची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

५. नगर परिषद प्रशासनाची कार्यवाही चालू !

सद्य:स्थितीत नगर परिषदेकडून या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांकडून लेखी खुलासा मागवला आहे. ‘सार्वजनिक बागेत आणि तलावाच्या ठिकाणी नमाजपठण होत असतांना सुरक्षारक्षकांनी प्रतिबंध का केला नाही ?’, याचीही चौकशी केली जात आहे. नगर परिषदेने तलाव आणि उद्यान परिसरात ‘सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करण्यास सक्त मनाई (बंदी) आहे’, असे स्पष्ट सूचनांचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण नारायण तलावाचा परिसर ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल’, असे नगर परिषद प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

हे वाचा → चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील नारायण तलावाच्या परिसरात मुसलमानांचे नमाजपठण

६. संधीचा लाभ घेऊन पोलीस कर्तृत्व दाखवणार का ?

‘तलावाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे’, असे म्हटले जात आहे. पोलिसांकडून शांतता समितीची बैठक आणि सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धार्मिक कृत्य केल्याप्रकरणी संबंधितांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. सध्या भारतात सर्वत्र धर्मांध मुसलमानांकडून सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी जागेत नमाजपठण करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे एक सुनियोजित षड्यंत्र असल्याचे पोलिसांना समजत नाही, असे नाही. हे षड्यंत्र उद्ध्वस्त करायचे कि मुसलमानांना नमाजपठणासाठी आणखी नवीन संधी द्यायची ? हे पोलिसांच्या कारवाईवरून लक्षात येईलच ! तूर्तास तरी पोलीस नियमबाह्य कृती करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कठोर कारवाई करण्याची संधी घेऊन खरी शांतता मिळू देतात कि पुन्हा सर्वांना अशांततेला सामोरे जाण्याची वेळ येणार ? हे येणारा काळच ठरवील !

– श्री. संतोष गांधी, फोंडा, गोवा. (४.२.२०२६)