मॉस्को (रशिया) – राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारत आणि येथील जनता यांची उघडपणे प्रशंसा केली आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे अनेक दशके जुने आहेत. आमचे नाते विश्वास आणि बंधुभावाचे आहे, जे काळाच्या ओघात अधिकच दृढ झाले आहे, असे त्यांनी म्हटले. पुतिन यांनी नमूद केले की, भारतीय लोक अत्यंत प्रतिभावान आणि उच्चशिक्षित आहेत. कोडिंग आणि तांत्रिक क्षेत्रांमधील भारतियांच्या नैपुण्यावर प्रकाश टाकतांना त्यांनी सांगितले, ‘भारतियांच्या क्षमतेमुळे त्यांना जगभरात आदर आणि ओळख मिळाली आहे. भारतीय व्यावसायिकांनी माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर विकास आणि इतर आधुनिक क्षेत्रे यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीची जागतिक स्तरावर चर्चा होते.
ते पुढे म्हणाले की,
१. भारतीय प्रतिभा, शिक्षण आणि तांत्रिक नैपुण्य याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. वर्ष १९४७ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध सातत्याने बळकट झाले आहेत, असे पुतिन यांनी नमूद केले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत त्याच्या राष्ट्रीय हितावर आधारित निर्णय घेतो आणि बाह्य दबावाला बळी पडत नाही.
३. भारतावर निर्बंध लादण्याचा कोणताही प्रयत्न उलट ठरू शकतो; कारण हा देश स्वतःची धोरणे आणि आर्थिक हितांशी सुसंगत निर्णय घेण्यास सक्षम आहे.

UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman