
कोल्हापूर – हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासन, मंदिर विश्वस्त-प्रमुख, संत यांना देण्यात आले. सर्वांनी ‘या प्रस्तावित कायद्याला विरोध करू’, असे सांगितले.

१. कळे येथील आंबडे येथे श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त श्री. बोरवणकर महाराज यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, तसेच अन्य उपस्थित होते.

२. पन्हाळा तहसीलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि ‘श्री केदारलिंग देवसंस्थान हक्कदार आणि वतनदार पुजारी मंडळ’ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘शाहू वैदिक विद्यालय जोतिबा डोंगर’चे प्रमुख आचार्य श्री. विश्वास झुगर, ‘वेदांती गुरुकुलम्’चे आचार्य श्री. प्रकाश झुगर, ज्योतिर्लिंग पुरोहित संघाचे खजिनदार श्री. विजय बुणे, सर्वश्री अक्षय शिंगे, अखिलेश भोरे, इंद्रनील चौगले, ओंकार बनकर, ओम झुगर उपस्थित होते.
३. करवीर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.

४. आसुर्ले-पोर्ले येथील मठाधिपती श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात महाराज म्हणाले, ‘‘सध्या ज्या भूमी ज्या देवस्थानांच्या नावावर आहेत त्या देवस्थान, मंदिरे यांच्या नावावरच राहिल्या पाहिजेत. या कायद्याला विरोध होत असून त्यानंतरही सरकारने हा कायदा केल्यास साधू-संत, हिंदुत्वनिष्ठ याला रस्त्यावर उतरून विरोध करतील.’’
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६