इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump

अमेरिकी गुप्तचर विभागाचा अहवाल मात्र याच्या अगदी विरुद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, अलीकडील संघर्षानंतर इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठी हानी झाली आहे. ‘एन्.बी.सी. न्यूज’ने आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इराणकडे आता त्याच्या मूळ क्षेपणास्त्र क्षमतेपैकी केवळ २१ ते २२ टक्के क्षमता शेष आहे. इराणकड अजूनही मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे आहेत. तथापि आक्रमण चालू झाले, तेव्हा त्याच्याकडे जेवढा क्षेपणास्त्रांचा साठा होता, तेवढा आता नाही.

ट्रम्प यांची विधाने गुप्तचर संस्थांच्या अहवालांपेक्षा वेगळी !

ट्रम्प यांचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या अहवालांशी जुळत नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका अहवालानुसार गेल्या महिन्यात अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आलेल्या माहितीवरून असे समोर आले होते की, इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या  जवळ असलेल्या त्याच्या ३३ पैकी ३० क्षेपणास्त्र तळांवर पुन्हा कार्यात्मक नियंत्रण मिळवले आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, संघर्षापूर्वीच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी अनुमाने ७० टक्के साठा इराणकडे अजूनही शेष आहे.

संपादकीय भूमिका

क्षणाक्षणाला स्वतःची विधाने पालटून विश्वासार्हता गमावलेल्या ट्रम्प यांच्या या विधानावर आता कोण विश्वास ठेवणार ?