
कोलकाता (बंगाल) – दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर बाँबस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार आणि भांगर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शौकत मोल्ला यास अटक केली. हे प्रकरण विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या एका स्फोटाशी संबंधित असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण घायाळ झाले होते. हा स्फोट झाला, तेव्हा त्या भागात ‘क्रूड बाँब’ (साध्या प्रकारचे बाँब) बनवले जात होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ५ जूनला जीवनतला येथील शौकत मोल्ला याच्या निवासस्थानी धाड घालण्यात आली; परंतु तो तेथे सापडला नाही. धाड पडल्याची कुणकुण लागताच तो मोटारसायकलवरून पळून गेल्याचा दावा अन्वेषण यंत्रणेने केला आहे.
🚨 Bengal Bomb Politics Exposed! 💣⚠️
Former Trinamool Congress MLA Saokat Molla arrested in connection with the Bhangar bomb blast case in South 24 Parganas, Bengal.
Reports indicate he allegedly attempted to flee to Bangladesh before being caught.
In fact, the TMC, which is… pic.twitter.com/LxAToWb8Cg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 6, 2026
बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न !
शौकत याने बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात त्याला यश न आल्याने त्याने एका अधिवक्त्याशी संपर्क साधून अन्वेषण यंत्रणांसमोर शरणागती पत्करण्याची सिद्धता चालू केली. तो शरणागती पत्करण्यापूर्वीच अन्वेषण यंत्रणेने त्यास कोलकाताजवळील बारुईपूर परिसरातून अटक केली. शौकत मोल्ला याच्या कुटुंबियांनी मात्र ‘त्यास अटक करण्यात आली नसून त्याने स्वतःहून शरणागती पत्करली आहे’, असा दावा केला. या प्रकरणी आतापर्यंत शमशुल सरदार याच्यासह चार जणांना अटक केली आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी