नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !

वसतीगृहातील खोलीतील देव्हारा (डावीकडे) व पादत्राणाच्या खणाच्या येथे फेकलेल्या मूर्ती (उजवीकडे)

नवी मुंबई – नेरूळ (पश्चिम) येथील सेक्टर ६ मध्ये असलेल्या ‘शुश्रुषा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती ख्रिस्ती धर्मांतरित युवतीने फेकून दिल्या. (बाटगे ख्रिस्ती हे पोपपेक्षाही कडवे असतात, याचे हे उदाहरण ! – संपादक) हा सर्व गंभीर प्रकार लक्षात घेता संबंधित धर्मांध ख्रिस्ती युवतीला रुग्णालय आणि वसतीगृह येथून निलंबित करण्याची मागणी हिंदु युवतीने रुग्णालयाचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. (देवतांच्या अवमानाच्या विरोधात तक्रार करणार्‍या धर्मप्रेमी हिंदु युवतीचे अभिनंदन ! – संपादक)

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

याविषयीची तक्रार ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे. या तक्रारीनुसार हिंदु युवती रहात असलेल्या वसतीगृहातील खोलीत ही धर्मांध ख्रिस्ती युवती ४ दिवसांपूर्वी रहाण्यास आली होती. या खोलीमध्ये असलेल्या लाकडी देव्हार्‍यामध्ये श्री गणेश, श्रीकृष्ण आणि श्री विठ्ठल यांच्या मूर्ती होत्या. हिंदु युवती नियमितपणे या देवतांची पूजा करायची. ख्रिस्ती धर्मांध युवती वसतीगृहात आल्यावर तिने हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचा त्रास होत असल्याचे सांगत हिंदु युवतीला खोलीतील मूर्ती हटवण्यास सांगितले. मूर्ती हटवण्यासाठी खोलीत आल्यापासून ती सतत भांडण करत होती. हिंदु युवती आणि धर्मांध ख्रिस्ती युवती या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहेत. ५ जून या दिवशी हिंदु युवती रुग्णालयात कामावर गेली असता धर्मांध ख्रिस्ती युवतीने हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती खोलीच्या बाहेर कचर्‍याच्या डब्याच्या ठिकाणी पादत्राणाच्या खणाच्या येथे फेकून दिल्या. हिंदु युवती खोलीवर आल्यावर देवतांच्या मूर्ती फेकण्याविषयी जाब विचारला असता धर्मांध ख्रिस्ती युवती भांडायला लागली. ही धर्मांध ख्रिस्ती युवती रुग्णालयातही ख्रिस्तींच्या व्यतिरिक्त अन्य धर्मियांसमवेत दुजाभावाने वागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्‍या ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष किती टोकाचा आहे, हेच यावरून लक्षात येते. यावरून ख्रिस्ती संस्था, चर्च, तेथील पाद्री आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदूंच्या देवतांविषयी किती द्वेष पसरवत असतील, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे. हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठ सरकारे असतांना हिंदूंना अन्य धर्मियांकडून द्वेषपूर्ण वागणूक मिळणे, हे संतापजनक होय !