भारतीय रिझर्व्ह बँकेने १२ अब्ज डॉलर्सचे सोने विकल्याचा केला होता तथ्यहीन दावा !
न्यू यॉर्क (अमेरिका) – अमेरिकन वृत्तसंस्था ‘ब्लूमबर्ग’ने २ जून या दिवशी प्रसिद्ध झालेला भारताच्या विरोधातील लेख मागे घेतला. या लेखात इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचा परकीय चलनसाठा सुधारण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (‘आर्.बी.आय.’ने) अनुमाने १२ अब्ज डॉलर्सचे सोने विकल्याचा दावा करण्यात आला होता. या लेखात अमेरिका-इराण तणाव, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर जाणे, रुपयाचे डॉलरसमोर ९७ पर्यंत अवमूल्यन आणि भांडवल बाहेर जाणे यांचा उल्लेख करून सोनेविक्रीचा तर्क मांडण्यात आला होता.
🚨 Bloomberg Forced to Withdraw Anti-India Article!
The US news agency falsely claimed that the Reserve Bank of India had sold $12 billion worth of gold.
Following India's clarification, the report was withdrawn.
Repeated dissemination of misleading reports targeting India's… pic.twitter.com/5fh3ZdsYzx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 6, 2026
सोन्याच्या साठ्यात घट नाही ! – भारत
तथापि आर्.बी.आय.ने स्पष्ट केले की, बाजारभावातील चढ-उतारांमुळे मूल्यांत किरकोळ पालट दिसले असले, तरी भौतिक सोन्याच्या साठ्यात कोणतीही घट झालेली नाही. ‘आर्.बी.आय.’ने या बातम्यांचे ठामपणे खंडण करत सध्याचा भौतिक सोन्याचा साठा ८८०.५२ मेट्रिक टन इतकाच कायम असल्याचे स्पष्ट केले. ‘सोन्याच्या विक्रीविषयी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या अचूक नाहीत’, असे सांगत नागरिकांनी अधिकृत बातम्यांमधील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही भारताने केले.
दावा चुकीच्या विश्लेषणावर आधारित असल्याची ‘ब्लूमबर्ग’ची स्वीकृती !
‘ब्लूमबर्ग’च्या दक्षिण आशिया कार्यकारी संपादक जेनेट रॉड्रीग्ज यांनी स्पष्ट केले की, आर्.बी.आय.च्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य मोजतांना त्याच दिवशीच्या देशांतर्गत सोन्याच्या दरांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. प्रत्यक्षात ‘लंडन बुलियन मार्केट असोसिएशन’च्या आदल्या दिवसाच्या दरांनुसार गणना केल्यास मे महिन्यात सोन्याचा साठा अपरिवर्तित राहिल्याचे दिसते. त्यामुळे ‘ब्लूमबर्ग’ने लेख मागे घेतला.

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !