‘गोवेश्वर महिमा संहिता’ ग्रंथाचे लोकार्पण

जुने गोवे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वायंगणी, जुने गोवे येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभदिनी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा विधीवत अन् मोठ्या थाटात झाला. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सौ. सुलक्षणा सावंत यांनी धार्मिक विधी केले. धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मंदिराबाहेर येऊन मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी मंडपातील सहस्रो भक्तांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज, तसेच देशभरातून आलेले वेगवेगळ्या आखाड्याचे साधूसंत यांची उपस्थिती होती. सर्व धार्मिक विधी नाशिकचे वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंदिर आणि इतर परिसर फिरून पाहिला अन् मंदिराची उभारणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर मुख्यमंत्री सपत्नीक प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये सहभागी झाले.
A sacred milestone in Goa’s spiritual journey, Pran Pratishtha of Shri Goveshwar Devasthan, inspiring faith, unity, and devotion.
Har Har Mahadev. pic.twitter.com/yJ7zKSX2vz
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) February 15, 2026
मुख्यमंत्र्यांनी या वेळी सपत्नीक गोवेश्वर महाशिव मंदिरातील ६ फूट उंचीच्या पिंडीचे पूजन केले. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण झाले. कलशारोहणाच्या वेळी मंदिरावर ध्वजारोहणही करण्यात आले. येथे गेले ३ दिवस चालू असलेल्या भव्य सोहळ्याची १५ फेब्रुवारी या दिवशी सांगता झाली. संपूर्ण सोहळ्यात साधूसंत, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश यांसारख्या अनेक राज्यांतून सहस्रो भाविक गोव्यात आले होते.
गोवेश्वर महाशिव मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेमुळे गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्याला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. मध्यंतरीच्या काळात ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो सफल झाला नाही. पोर्तुगिजांनी हिंदूंची मंदिरे, मठ आणि धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र आमच्या पूर्वजांनी मंदिरे आणि धर्म टिकवून ठेवला. जुने गोवे येथील एक अत्यंत प्राचीन मंदिर एकेकाळी उद्ध्वस्त झाले होते. आता अनेक वर्षांनंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी या ठिकाणी ‘गोवेश्वर महादेव मंदिर’ उभारले आहे.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) February 15, 2026
१२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी सामान्यतः देशभरातील १२ वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो; परंतु महाराजांनी येथे सर्व १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठा केली आहे. यामुळे आता गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांना अन्य कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही, तर गोवेश्वर महाशिव मंिदरातच सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. या मंदिरामुळे गोव्याच्या संस्कृतीत भर पडली आहे. मंदिरात १२ ज्योतिर्लिंगे स्थापन केल्यामुळे गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी गोवा, महाराष्ट्र यांबरोबरच देशभर व्यसनमुक्ती, पर्यावरणाचे रक्षण आदी क्षेत्रांमध्ये, तसेच देव, देश आणि धर्म रक्षणाचे मोठे कार्य केले आहे. हे कार्य आणखी ५०० वर्षे टिकून राहील एवढे ऐतिहासिक आहे. महाराजांनी नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम केले आहे.’’

गोवेश्वर महाशिव मंदिराचे वैशिष्ट्य
गोवेश्वर महाशिव मंदिर हे पाषाणातील कोरीव कलाकृती आहे. यासाठी चुनार दगडाचा वापर करण्यात आला आहे. बांधकामात कुठेही लोखंड वापरलेले नाही. येथे १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा आनंद येथे येणार्या भक्तांना मिळणार आहे.
During visit on the auspicious occasion of the Pran Pratishtha of the Goveswar #Mahadev Temple, Shrisatshakti (Mrs) Binda Singbal met Sanjaydasji Maharaj, National President of Sankatmochan Sena, and P. P. Kanifnath Maharaj, the Uttaradhikari (successor) of the Shri Sampradaya… pic.twitter.com/Yo6bK0hIF6
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 15, 2026
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी लिखित ‘गोवेश्वर महिमा संहिता’ ग्रंथाचे लोकार्पण
गोवेश्वर महाशिव मंदिरात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी लिहिलेल्या ‘गोवेश्वर महिमा संहिता’ या ग्रंथाचे लोकार्पण १५ फेब्रुवारी या दिवशी गोव्याचे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ. सुलक्षणा सावंत, जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज, संतमहंत आदी उपस्थित होते. या ग्रंथाचे लेखन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले आहे. ग्रंथाविषयी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, ‘‘हा ग्रंथ म्हणजे गोव्याच्या वैदिक सनातन परंपरेचा इतिहास मांडणारा आहे. १ सहस्र ४०० पानांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोव्याच्या धार्मिक इतिहासाचा महत्त्वाचा पुरावा ठरणारा आहे. तो गोव्याच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा एक नवा अध्याय ठरणार आहे.’’
ग्रंथ प्रकाशनाची भूमिका सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गार !![]() ‘गोवेश्वर महिमा संहिता’ ग्रंथाचे लोकार्पण झाल्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी उपस्थित सर्वांचे आभार मानतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विशेष उल्लेख केला. ‘सनातन संस्थेचे संत आणि साधक येथे उपस्थित आहेत. सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.
प.पू. डॉ. आठवले आणि माझे जुने अन् घनिष्ठ संबंध आहेत. आमच्या दोघांच्या संकल्पनेतूनच ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली आहे’, असे गौरवोद्गार महाराजांनी काढले. या वेळी श्री संप्रदायाच्या वतीने सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि श्री. महावीर श्रीश्रीमाळ उपस्थित होते. |
सनातन संस्थेच्या वतीने जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सन्मान

जुने गोवे – ‘गोवेश्वर महिमा संहिता’ ग्रंथाचे लोकार्पण झाल्यानंतर जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांचा सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी शाल, श्रीफळ आणि सनातननिर्मित भगवान शिवाचे सात्त्विक चित्र भेट देऊन सन्मान केला.
The Pran Pratishtha and Kalasharohan ceremony of the magnificent Goveswar #Mahadev Temple was completed on 15 Feb 2026 at Vayangani, Old Goa. This grand stone carved temple has been designed by Jagadguru Ramanandacharya Narendraacharyaji Maharaj (@_Jagadguru) himself and stands… pic.twitter.com/tRAEFLVq35
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 15, 2026
याप्रसंगी उपस्थित संतांना उल्लेखून प.पू. महाराज म्हणाले, ‘‘संत कसे तेजस्वी असतात, हे सनातनच्या संतांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.’’ त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. नंतर सर्वांना म्हणाले, ‘‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पुष्कळ आवडते. त्यांनी लोकांना धर्म कळावा, यासाठी छोट्या छोट्या अनेक पुस्तिका लिहून काढल्या आहेत. नाणिजला ते २ वेळा येऊन गेले आहेत. मी डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी पुढच्या गोवा भेटीत सनातनच्या आश्रमात येणार आहे.’’

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता