जमियत उलेमा-ए-हिंदची धर्मांधता दर्शवणारे राष्ट्रघातकी विधान

नवी देहली – मुसलमान कुणालाही ‘वन्दे मातरम्’ गाण्यापासून किंवा वाजवण्यापासून थांबवत नाहीत; परंतु गाण्यातील काही कडवी मातृभूमीला ‘देवता’ म्हणून दर्शवतात. हे आमच्या श्रद्धेच्या विरुद्ध आहे. एक मुसलमान केवळ एका अल्लाची पूजा करतो. त्यामुळे त्याला हे गाणे गाण्यास भाग पाडणे, हे राज्यघटनेच्या कलम २५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली आहे. केंद्रशासनाने राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच सन्मान देणे अनिवार्य केले आहे. आदेशानुसार राष्ट्रीय गीताचे सर्व ६ कडवी गायली जातील, ज्यांची एकूण वेळ ३ मिनिटे १० सेकंद आहे. आतापर्यंत मूळ गीताची पहिली दोन कडवीच गायली जात होती.
🔥 Enough of Divisive Narratives – Nation Comes First
“Muslims only worship Allah, so they won’t say Vande Mataram.” – Maulana Arshad Madani’s remarks reflect an uncompromising ideological rigidity that raises serious concerns about Jamiat Ulema-e-Hind’s commitment to national… https://t.co/wDHB6FoIbu pic.twitter.com/dYJ3827GJD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 12, 2026
मदनी यांनी व्यक्त केलेली सूत्रे . . .
१. हे गीत अनिवार्य करणे आणि ते नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करणे हे देशभक्तीचे प्रदर्शन नाही, तर हे निवडणुकीचे राजकारण, एक धार्मिक कार्यसूची (अजेंडा) आणि मूलभूत सूत्रे यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.
२. देशावरील प्रेमाचे खरे मोजमाप घोषणांमध्ये नाही, तर चारित्र्य आणि त्याग यांत आहे. (देशासाठी मुसलमान किती त्याग करतात आणि देशविरोधी किती कृत्य करतात, हे भारतियांना ठाऊक आहे ! – संपादक) याची उत्कृष्ट उदाहरणे मुसलमान आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांच्या ऐतिहासिक संघर्षात पाहिली जाऊ शकतात. (मुसलमानांकडून नेहमी जे काही ‘ऐतिहासिक संघर्ष’ म्हणून सांगितले जातात, ते भारतासाठी नाही, तर मोगलांचे म्हणजे मुसलमानांचे या देशावरील राज्य कायम ठेवण्यासाठीचे होते, हे हिंदूंना ठाऊक आहे ! – संपादक)
३. असे निर्णय देशाची शांतता, एकता आणि लोकशाही मूल्ये यांना दुर्बल करतात आणि राज्यघटनेच्या भावनेलाही दुर्बल करतात. ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करणे हा राज्यघटना, धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व यांवर स्पष्ट आक्रमण आहे. (लोकशाही मार्गानेच, राज्यघटनेच्या स्वातंत्र्यानुसारच हे गीत अनिवार्य करण्यात आले आहे; मात्र प्रत्येक वेळी राज्यघटनेचे आणि लोकशाहीचे नाव घेऊन खोटारडेपणाने विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान करत असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे ! – संपादक)
हे वाचा → Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रीय गीत म्हणणे देशभरासाठी अनिवार्य !
संपादकीय भूमिका
|
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !