|
नवी देहली – केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषित केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा यांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यांमध्ये ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणे अनिवार्य असणार आहे. ३ मिनिटे १० सेकंदाच्या या राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे रहावे लागणार आहे. या गीतीची संपूर्ण ६ कडवी गायली जाणार असून त्यात श्री दुर्गादेवीचा उल्लेखही असणार आहे. यापूर्वी केवळ २ कडवी गायली जात होती. त्यासाठी केवळ ६५ सेकंद लागत होती. ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच भाग म्हणून नवी नियमावली घोषित केल्याचे म्हटले जात आहे.
A Historic Move for the National Song! 🇮🇳
The MHA has announced that singing 'Vande Mataram' is now mandatory across India
As we celebrate 150 years of this iconic anthem, here are the key updates:
⏱️ The Protocol: Citizens must stand for 3 mins 10 seconds. All 6 stanzas to… pic.twitter.com/ArMGzjoPtz— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2026
झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करणे यांपूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रीय गीत (वन्दे मातरम्) एकत्र वाजवायचे असल्यास आधी ‘वन्दे मातरम्’ आणि नंतर ‘जण गण मन’ गायले जाईल. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि घटनात्मक संस्था यांना यासंबंधीचे निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत.

चित्रपटगृहांत ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य नाही
२८ जानेवारी या दिवशी केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली प्रसिद्ध केली आहे. १० पानांच्या निर्देशात कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य असेल, त्याची सूची देण्यात आली आहे. यात चित्रपटगृहाला वगळण्यात आले आहे.
| केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेली नवी नियमावली –
|
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’वर झाली होती चर्चा
‘वन्दे मातरम्’ राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्ष २०२५ च्या शेवटी झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’वर चर्चा करण्यात आली होती. यावेळी बंगाल राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून केंद्र सरकारने जाणीवपूर्वक राष्ट्रीय गीताचे सूत्र पुढे केले, असा आरोप काँग्रेसने केला होता. (प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्याच दृष्टीने पहाणारी काँग्रेस ! – संपादक)

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ला अनिवार्य करण्याचे प्रयत्न हिंदुत्व प्रचारासाठी !’ – असदुद्दीन ओवैसी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन च्या प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रीय गीत आहे; पण राज्यघटनेत त्याला गाण्याची अनिवार्यता लागू करणारा कोणताही कायदा नाही. ‘वन्दे मातरम्’ला अनिवार्य करण्याचे प्रयत्न हिंदुत्व प्रचारासाठी आहेत आणि पंथनिरपेक्षतेला धक्का देणारे आहेत. मुसलमान केवळ अल्लाची उपासना करतात आणि धर्माच्या आधारे राष्ट्रीय भावना मोजणे चुकीचे आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ‘वन्दे मातरम्’ला बलपूर्वक जोडले जात आहे जे राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.
हे ही पहा →
|
(म्हणे) ‘धार्मिक किंवा सांस्कृतिक दबाव निर्माण करणे चुकीचे !’ – अखिलेश यादव, खासदार, समाजवादी पक्ष
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले की, राज्यघटनेने नागरिकांना गायन निवडीचा अधिकार दिला आहे आणि कुणी ऐकावे किंवा न ऐकावे, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ‘वन्दे मातरम्’ला बलपूर्वक जोडल्याने धार्मिक किंवा सांस्कृतिक दबाव निर्माण होतो, जो समावेशक राष्ट्र भावनेला अंतर्भूत नाही.
यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही वन्दे मातरम् ऐकण्यास किंवा गायन करण्यास विरोध व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, मुसलमानांच्या भावनांचा आदर होण्याची आवश्यकता आहे आणि वन्दे मातरम् अनिवार्य करण्याची कल्पना चुकीची आहे.
हे ही वाचा → संपादकीय : वन्दे मातरम् ! |


हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री