(आय.एस्.आय. म्हणजे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) |
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये १२ फेब्रुवारी या दिवशी होणार्या संसदीय निवडणुकीवर हिंसेचे सावट असून त्याविषयी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेची चेतावणी दिली आहे. बांगलादेश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ आणि कट्टरतावादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ यांनी हातमिळवणी केली आहे.
१. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सत्तेत आल्यावर युनूस यांनी सर्वप्रथम ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेवरील बंदी उठवली आणि अनेक आतंकवाद्यांची कारागृहातून सुटका केली. आता हेच घटक निवडणुकीत हिंसाचार घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्यास जमातचे धर्मांध रस्त्यावर उतरून धुमाकूळ घालण्याची रणनीती आखत आहेत.
२. बांगलादेशावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान ‘जमात-ए-इस्लामी’ला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर निवडणुकीनंतर ‘स्वतःला राष्ट्रपतीपद मिळावे’ यासाठी युनूस यांनी आय.एस्.आय. आणि जमात यांच्या नेत्यांसह गुप्त बैठका घेतल्या आहेत. ‘निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, जेणेकरून सध्याचे अंतरिम सरकार सत्तेत राहील’, असेही सांगण्यात येत आहे.
३. त्याचप्रमाणे सार्वमताच्या माध्यमातून राज्यघटनेत पालट करून ‘बंगाली’ ऐवजी ‘बांगलादेशी’ हा शब्द रूढ करून देशाची मूळ ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे.
४. निवडणुकीच्या काळात राजकीय उमेदवारांच्या हत्यांसह अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे.
५. बांगलादेशातील या संभाव्य हिंसेचा परिणाम भारताच्या सुरक्षेवरही होऊ शकतो. बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाने सीमेवर गस्त वाढवली आहे.

वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क