काँग्रेसचे नेते रमानथ राय यांनी ‘मंदिरांवर भगवा ध्वज फडकवू नये’, असे धर्मद्रोही विधान केल्याचे प्रकरण !

बेंगळुरू (कर्नाटक) – स्वतः हिंदु असणारे आणि देवाची आराधना करणारे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रमानथ राय यांना भगवा ध्वज ‘राजकीय ध्वज’ वाटणे, हा मोठा विरोधाभास आहे. त्याग आणि शौर्य यांचे प्रतीक असलेला, साधू-संतांनी उंचावलेला आणि देशाच्या सनातन संस्कृतीचे प्रतीक असलेला भगवा ध्वज राजकीय ध्वज कसा होऊ शकतो ?, असा प्रश्न भाजपचे नेते सी.टी. रवि यांनी उपस्थित केला आहे. भगव्या ध्वजाला राजकीय ध्वज म्हणणे हे तुष्टीकरणाच्या राजकारणाखेरीज दुसरे काहीही नाही. काँग्रेस हा मुळात हिंदूविरोधी पक्ष आहे. धाडस असेल, तर काँग्रेसच्या नेत्यांनी ‘आम्ही भगवा ध्वज असलेल्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही आणि आम्हाला हिंदूंची मते नको आहेत’ असे घोषित करावे, असे आव्हान रवि यांनी दिले आहे.
सी टी रवी यांचे भाषांतरित ट्विट
(मूळ कन्नड ट्विट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा → https://x.com/CTRavi_BJP/status/2014222313005498523)
उडुपी येथील श्रीकृष्ण मठात साजरा केला जाणार्या ‘पर्याय’ या उत्सवामध्ये भगवा ध्वज फडकवल्यावर आक्षेप नोंदवत काँग्रेसने जिल्हाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रमानथ राय यांनी ‘मंदिरांवर भगवा ध्वज फडकवू नये’, असे धर्मद्रोही विधान केले होते. त्यावर रवि यांनी वरील आव्हान दिले.
सविस्तर वृत्त वाचा → मंदिरांवर भगवा ध्वज फडकवू नये ! – काँग्रेसचे नेते रमानथ राय यांचे धर्मद्रोही विधान

संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले