महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याची सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा !

जिल्हा नियोजन निधीतून ३ वर्षांत यासाठी १ सहस्र कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.

बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे !

महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. उत्तम विरोधक बनून सहकार्य करावे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ही राज्याची २ चाके आहेत. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”

विधीमंडळाच्या आवारात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी !

पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली.

अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या परिसरात अवैध धंदे चालणार्‍या चित्रपटगृहाचा परवाना रहित ! – गृहमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या शांभवी लॉजिंग आणि बालाजी चित्रपटगृह येथे अवैध धंदे चालू आहेत, अशी माहिती..

चुकीच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तोंडघशी पडले !

भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाने जास्त पैसे कमावले. ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण ६,००० कोटी रुपये ! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू ! – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने त्यांची २४ ऑगस्ट या दिवशी पंचायत समिती सभागृहात भेट घेऊन निवेदन सादर केले.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत !

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’, तर ‘उस्मानाबाद’चे नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा ठराव २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला.

‘पुणे हँडमेड पेपर्स’ आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडून अशास्त्रीय कागदी गणेशमूर्तींचा प्रचार !

चिकणमाती किंवा शाडूची माती यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे. त्यामुळे अशा हिंदु धर्मविरोधी उपक्रमांना सर्व गणेशभक्तांनी वैध मार्गाने विरोध करायला हवा !

कुपोषणामुळे राज्यात एकही बालमृत्यू झाला नसल्याचे आदिवासी विकासमंत्र्यांचे उत्तर अमान्य करत विरोधकांचा सभात्याग !

कुपोषणामुळे राज्यातील एकाही बालकाचा मृत्यू झालेला नसल्याची आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिलेली माहिती अमान्य करत २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला.