समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यूनता !

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कोणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सनातन संस्थेच्या आश्रमांचे अद्वितीयत्व ! 

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेच्या अभावी बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच !

‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कलियुगातील असेही आई-वडील !

‘स्वतः भ्रष्टाचार करून आपल्या मुलांसमोर भ्रष्टाचार करण्याचा आदर्श ठेवणारे कलियुगातील आई-वडील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे, हे राष्ट्रकर्तव्यच !

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

संत आणि गुरु यांच्या कार्यातील भेद !

‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठीच प्रयत्नरत रहाणे आवश्यक !

‘हिंदूंनो, केवळ राममंदिरासाठी नव्हे, तर हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत रहा, नाहीतर आतंकवादी राममंदिर नष्ट करतील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेचे अद्वितीयत्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले