नेहमी सत्संगात रहावे !
‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’
‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’
‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.
‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीसंबंधी थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे.
आजचा समाज ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ।’ म्हणजे ‘एका अंधाने नेलेल्या दुसर्या अंध माणसाप्रमाणे डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच चालला असून त्यातच ‘आपण धन्य झालो आहोत’, असे समजतो.’
‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले