श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.
‘पूर्वी लाच घेणारा शोधावा लागत असे. आता लाच न घेणारा शोधावा लागतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.
सर्वांच्याच भूमिका एकसारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाही मार्गदर्शन होण्यासाठी निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे; पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही
जो दुसर्याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’.
‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’
सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’
‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे.