परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा उलटपक्षी ते तसेच राहून जातात. हे चोरांना घरात कोंडून ठेवण्यासारखेच आहे.’
‘नोबेल पारितोषिक मिळवणार्यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकिऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’
देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जगाकडे नामरूपात्मक दृष्टीने बघणे आणि त्याला कारणीभूत असणारे स्वयं-प्रकाशमान अधिष्ठान विसरणे, म्हणजेच ‘अविवेक’. या वृत्तीमध्ये मोडणारे सर्व कार्यकारण भावज्ञान-विरहित भासणे होय.
पाश्चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे.
‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले