खासगी शाळांमधील शुल्क ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे ? हे राज्यशासन ठरवत नसल्याने विनाअनुदानित शाळांमधील शुल्काच्या संदर्भात अनेक तक्रारी राज्यशासनाकडे येत असतात. येणार्‍या काळात याविषयी स्थापन करण्यात आलेली समिती काम करेल.

वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !

मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्‍या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. वाचा संक्षिप्त वृत्तांत . . .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मायणी (जिल्हा सातारा) येथील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर’च्या बनावट डॉक्टर प्रकरणी १ मासात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर अँड रुग्णालय मायणी’ येथील संस्थेत बनावट प्रमाणपत्र देण्याचे व्यवहार करून बनावट आधुनिक वैद्य (डॉक्टर) सिद्ध केल्याच्या गंभीर तक्रारींची नोंद राज्य शासनाने घेतली आहे.

श्रीसाईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवत कायम करून वेतनातील फरक द्या ! – काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

श्रीसाई संस्थानमध्ये कायम कर्मचारी नियुक्तीचा निर्णय घेतला, तर पंढरपूर येथील मंदिरातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व मंदिरात कायम कर्मचार्‍यांविषयी निर्णय घ्यावा लागेल. आवश्यकता भासली, तर कर्मचारी नियुक्ती कायद्यात पालट करून निर्णय घेऊ. 

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलीस आणि आंतरधर्मीय विवाह समिती यांच्याकडे तक्रारी कराव्यात ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांचे आवाहन

भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला. 

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय देहली येथे हालवण्याचा कोणताही निर्णय नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी देहली येथे हालवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

२९६ रोग वगळून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने येणार !

ज्या रोगांवर उपचार घेतले जात नाहीत, असे २९६ रोग वगळून पुढील मासात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने आणण्यात येईल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.