मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – मुंबई येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी देहली येथे हालवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित झालेल्या या सूत्रावर निवेदन करतांना फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त आणि ५ अधिकारी यांना देहली येथे येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात ५०० अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे ‘संपूर्ण आयुक्तालय देहली येथे हालवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला’, असे म्हणणे चुकीचे आहे.