सर्वांसाठी लोकलचा निर्णय १५ डिसेंबरनंतर घेणार ! – आयुक्त

मुंबई – सर्वांसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतरच घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. ‘टीव्ही-९ मराठी’ या वृत्तवाहिनीबरोबर साधलेल्या विशेष संवादाच्या वेळी ते बोलत होते. राज्यात बहुतांश कार्यालये चालू झाली आहेत; परंतु लोकल सेवा सर्वांसाठी चालू नसल्याने कामावर जाणार्‍या अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवेविषयी सरकारकडे सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.