विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राची मागणी !
हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
राज्यातील ‘टीईटी’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारूढ पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्याशी संबंधित २ भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अप्रसन्नता !
श्रद्धा वालकर हिने केलेल्या तक्रारीमध्ये २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी स्वत:ला मारहाण झाली असल्याचे तिने स्पष्ट लिहिले होते. असे असतांना त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? त्यामुळे हा प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते, असा संशय भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
कोंबडीचे १० तुकडे करायचे असतील, तर १० वेळा विचार करावा लागतो. येथे एका मुलीचे ३५ तुकडे केले. कायद्यात तरतूद असती, तर याचे ३५ तुकडे करता आले असते. ७० तुकडे करता येतील, इतका हा नालायक आहे, असा तीव्र संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांत तक्रार करूनही कारवाई का झाली नाही ? तक्रार मागे घेण्यासाठी श्रद्धा हिच्यावर कुणाचा दबाव होता का ? पोलिसांवर राजकीय दबाव होता का ? या सर्वांची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.
अधिवेशनाच्या काळात आमदार सौ. सरोज अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष चालू करण्यात आला आहे.
शहरातील भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, अशी माागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. सत्ताधार्यांनी त्यांच्या विधानाला हरकत घेतली, याला विरोधकांनी आक्षेप घेतला. यातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाधिक वेळ कामकाज करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जनहित कधी साधणार ?
हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी प्रथम विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली, तर त्याच ठिकाणी सत्ताधार्यांकडूनही आंदोलन करण्यात आले.