‘विजयदुर्ग’च्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

नागपूर येथे भिकार्‍यांविरुद्ध जमावबंदी आदेश लागू !

पोलिसांनी १५० भिकार्‍यांना कह्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी सोडले. यात ३० मुले, ४० महिला आणि ८० पुरुष यांचा समावेश आहे.

दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक; गुन्हा नोंद !

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून संपावर !

या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

अर्थसंकल्पामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालना ! – अवधूत वाघ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते

भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

३० मार्चपर्यंत आवश्यक त्या सुविधा न दिल्यास पेट्रोलपंपांवर होणार कारवाई !

स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे, ज्यावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार.

हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !  

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.

व्यापारी, नागरिक यांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले.

अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांसह म्हाडाच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला !

अनिल परब यांनी म्हाडाची भूमी हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाच्या वतीने नोटीसही देण्यात आली होती; पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली.