मेरठ (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या वर्गणीवरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

एक मुसलमान नगरसेवक हिंदूंना इस्लाम स्वीकारण्यास सांगत असेल, तर उद्या देशातील धर्माभिमानी हिंदु लोकप्रतिनिधींनी धर्मांतरित मुसलमानांना हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करण्यास सांगितले, तर त्याला चुकीचे कुणी म्हणेल का ?

(म्हणे) ‘मी ब्रिटनमध्ये बोलू शकतो; पण भारतीय संसदेत चीनच्या घुसखोरीचे सूत्र उपस्थित करण्याची अनुमती नाही !’-राहुल गांधी

भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ?

भारतातील स्वित्झर्लंडच्या राजदूतांना देण्यात आली समज !

राल्फ हेकनर यांनी ‘भारताची भूमिका स्वित्झर्लंड सरकारला कळवण्यात येईल’, असे आश्‍वासन दिल्याचेही सांगण्यात आले. याविषयी सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

‘आष्टी’च्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी नेमण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले, पण त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून आष्टी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत ! – उपमुख्यमंत्री

राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असून पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण केले जाईल, तसेच एकाच विषयाचे खटले ३ ठिकाणी असून त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

गोवा : अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !

कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.