३० मार्चपर्यंत आवश्यक त्या सुविधा न दिल्यास पेट्रोलपंपांवर होणार कारवाई !


रत्नागिरी – पेट्रोलियम आस्थापनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेट्रोलपंपावर येणार्‍या ग्राहक आणि नागरिक यांसाठी आवश्यक त्या सुविधा विनामूल्य देणे आवश्यक आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर या सुविधा उलपब्ध केलेल्या नाहीत. जिथे सुविधा उपलब्ध आहेत. त्या सर्वसामान्यांसाठी नाहीत. त्यामुळे आता या प्रश्‍नावर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकार्‍यांंनी लक्ष केंद्रित केले आहे. ३० मार्चपर्यंत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास पेट्रोलपंपांचे परवाने रहित का केले जाऊ नयेत ? अशी विचारणा केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपावर काही ठिकाणी साधे प्रसाधनगृहही नाही. त्यामुळे महिलांसाठी मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी सुविधा पूर्णतः बंदस्थितीत आहेत. तर काही ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्थित देखभाल अथवा स्वच्छता ठेवण्यात येत नाही, असे जिल्हा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे.

स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे; मात्र ज्या पेट्रोलपंपावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार असल्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे पण वाचा:

Rights and Responsibilities at a Petrol Pump