मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत १० मार्च या दिवशी भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या आणि म्हाडा यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, मी हा हक्कभंग पडताळून योग्य तो निर्णय घेते. सध्या हक्कभंग समिती सिद्ध झालेली नाही. त्यामुळे तो माझ्याच अखत्यारीत आहेत. पुढील आठवड्यात समिती गठीत करणार आहोत.
किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब आक्रमक; विधान परिषदेत मांडला थेट हक्कभंग प्रस्ताव; म्हणाले…https://t.co/9ZYEHh1qY6
— LoksattaLive (@LoksattaLive) March 10, 2023
अनिल परब यांनी म्हाडाची भूमी हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाच्या वतीने नोटीसही देण्यात आली होती; पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली. ‘या सर्व प्रकारामुळे माझी नाहक अपकीर्ती झाली’, असे अनिल परब यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यावर सांगितले.