पुण्यातील कारागृह अधीक्षकांनी मागितली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची अनुमती !
पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.
पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये स्वत:च्या २ मुलांना मुंडे यांनी शासकीय चित्रकूट बंगल्यामध्ये डांबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?
गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते.
नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.
रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे.
केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.