निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंचा हिंदुतेजाचा अविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बीपी रोड येथे २७ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुलिंग चेतवले गेले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी २५ नोव्हेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली.

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभा !

वार आणि दिनांक : रविवार, २७ नोव्हेंबर २०२२, वेळ : सायंकाळी ५
स्थळ : श्री गणेश मंदिर, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व), मुंबई – ४०००४२

माहीम (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंची धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

या एकवक्ता सभेला पुष्कळ राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ३९ धर्मप्रेमींनी समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांच्याशी अनौपचारिक संवाद साधून धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

आज प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने ते आपली संस्कृती आणि धर्म यांपासून दूर जात आहेत. विदेशी लोक आज हिंदु संस्कृतीनुसार आचरण करत आहेत; परंतु भारतातील बहुसंख्य हिंदू धर्मपालन करण्याकडे पाठ फिरवत आहेत.

मातेकडून नीती, पित्याची भीती आणि धर्माचरणात मती असणारी युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू शकत नाही ! – योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार

बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ७ सहस्रांहून अधिक हिंदू एकवटले !

छत्रपती शिवरायांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडवण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा ! – संतोष वर्तक, संचालक, वर्तक क्लासेस

कळंबोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून हिंदू एकतेचा आविष्कार !

कळंबोली येथे वाहनफेरीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार !

यावेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. शीतल चव्हाण यांनी राष्ट्र-जागृती सभेमागील उद्देश सांगून सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वाच्या जयघोषाने चंपावतीनगरी दणाणली !

येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) या ठिकाणी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार केला.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.