निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंचा हिंदुतेजाचा अविष्कार !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, (मध्यभागी) श्री. मनोज खाडये आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर

निपाणी – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बीपी रोड येथे २७ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुलिंग चेतवले गेले. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले.

(सविस्तर वृत्त वाचा लवकरच…!)