हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वाच्या जयघोषाने चंपावतीनगरी दणाणली !

दीपप्रज्वलन करतांना श्री. योगेश महाराज साळेगावकर,समवेत श्री. मनोज खाडये आणि सद्गुरु स्वाती खाडये

बीड, २० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) या ठिकाणी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार केला. या सभेचा प्रारंभ मान्यवर वक्ते राष्ट्रीय कीर्तनकार आणि प्रवचनकार श्री. योगेश महाराज साळेगावकर, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. सभेमध्ये मान्यवर वक्त्यांच्या जाज्वल्य मार्गदर्शनाने आणि हिंदुत्वाच्या जयघोषाने चंपावतीनगरी दणाणून गेली होती.