अमेरिकेचे स्वार्थांध रूप जाणा !
भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे. तसेच ती भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. तिला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही, असा घणाघात रशियाने अमेरिकेवर केला आहे.
भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे. तसेच ती भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. तिला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही, असा घणाघात रशियाने अमेरिकेवर केला आहे.
बलिया (उत्तरप्रदेश) येथील ‘सेंट मेरी’ या मिशनरी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या प्रभाकर नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकली. याविषयी जाब विचारणार्या मुलाच्या आईशीही शाळेने गैरवर्तन केले.
परीक्षेत उच्च जातीचे लोक प्रश्नपत्रिका काढतात. त्यामुळे दलित जातीतील लोक नापास होतात, अशा प्रकारे व्यवस्थेवर अविश्वास दर्शवणारे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारताच्या बाहेर कधीच नव्हता; परंतु लोकांना हे विसरायला लावले गेले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे नाव न घेता केले.
पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात भारतीय वायूदलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ४ जण घायाळ झाले. आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये झालेले हे तिसरे आक्रमण आहे.
नेपाळने त्याच्या १०० रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या भारतातील ३ भागांचा समावेश करण्यात येणार आहे.
बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये ‘तुम्ही (हिंदू) ३० टक्के आणि आम्ही मुसलमान ७० टक्के आहोत. येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान २ घंट्यांत भागीरथी (गंगा) नदीत तुम्हाला बुडवतील’, अशी धमकी तृणमूल काँग्रेसचे आमदार..
अमेरिकेतील प्रसारमाध्यम सी.एन्.एन्.ने ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले’, असा आरोप करणारा एक लेख प्रकाशित केला आहे.
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे. रितम याने बनावट व्हिडिओ शेअर करतांना भाजपच्या नेत्यांना कारागृहात पाठवण्याची धमकीही दिली होती.
मुंबईत पैशांवरून झालेल्या किरकोळ वादावरून मुसलमानांनी अक्षय नार्वेकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली, तर त्याचा मित्र आकाश साबळे गंभीररित्या घायाळ झाला. अक्षय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई होता.