बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

बांगलादेशमध्ये आरक्षणावरून गेले काही दिवस झालेल्या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे दाखवणारे व्हिडिओ प्रसारित झाले. आंदोलक ‘ज्यांच्या मामाचे घर भारत आहे, त्यांनी लवकर बांगलादेश सोडावे’, असे म्हणत होते.

काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा ! 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मंगळुरूमधील शाळांच्या मैदानांचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी न करण्याचा आदेश दिल्यानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसाठी शाळांची मैदाने देण्यास नकार दिला आहे.

भारत पाकला असे प्रत्युत्तर कधी देणार ?

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविव शहरावर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. यात ३ हुती बंडखोर ठार, तर ८७ जण घायाळ झाले आहेत.

देशात धर्मांध उद्दाम, तर हिंदू असुरक्षित !

दिंद्रुड (बीड) येथे मेहबूब सुभान दर्ग्याच्या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्‍या ३ विद्यार्थ्यांना मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

संपूर्ण देशात दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचा कायदा करा !

प्रशासनाच्या आदेशानंतर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दुकानदार, तसेच फळविक्रेते यांनी दुकाने आणि हातगाड्या यांच्यावर स्वतःची नावे लिहिण्यास प्रारंभ केला आहे.

देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत मोहरमच्या मिरवणुकींत पॅलेस्टिनी झेंडे फडकावले जाण्यासह दगडफेक, मारामारी आणि लुटमार झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.

बरेली भारतात आहे कि पाकिस्तानात ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांनी धर्मांतर करून नंतर मुसलमानांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे विधान ‘इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदे’चे (‘आय.एम्.सी.’चे) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी केले आहे.

अशा धर्मांधांना आजन्म कारागृहात डांबा !

उत्तरप्रदेश सरकारने मोहरमच्या मिरवणुकांविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केल्यावर ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य महंमद कमाल फारुकी यांनी ‘मोहरमवर निर्बंध लादले, तर कावड यात्रा, रामलीला आणि गुरुनानक जयंतीही बंद पाडू’, अशी धमकी दिली आहे.

झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरीची वाढती समस्या जाणा !

झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

रेल्वे पोलिसांसाठी हे लांच्छनास्पद !

अमळनेर (जळगाव) येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांनी २० मिनिटे रेल्वेवर दगडफेक केली. यासाठी त्यांनी ८ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबवून ठेवली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल २४ घंटे विलंबाने गुन्हा नोंद केला.