अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

गेल्या ११ मासांमध्ये पुणे रेल्वे विभागात विनातिकीट प्रवाशांकडून २२ कोटी रुपयांचा दंड वसूल !

नागरिकांवर नियम पालनाचा संस्कार नाही, हेच लक्षात येते. जे प्रवासी नियमांचे पालन करत नसतील त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षाच द्यायला हवी !

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करणार !

कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या नियमितच्या कामांचीही नोंद घेणे आवश्यक असल्याची मागणी विधानसभेत उपस्थित करण्यात आली.

सर्वाेच्च न्यायालयाकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना देश-विदेशांत ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा आदेश

केवळ मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याचे दायित्व अल्प खर्चिक असले, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू !  

श्री. शुक्ला यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू असे आश्वासन दिले.

गोवा  गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाची ६ प्रकल्पांना अनुमती

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने २८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत गोव्यात  ६ प्रकल्पांना अनुमती दिली. या प्रकल्पाद्वारे राज्यात ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

महागाईमुळे ब्रिटनच्या बाजारातून टोमॅटो गायब !

पाकिस्तान पाठोपाठ आता ब्रिटनमध्येही महागाई प्रचंड वाढली आहे. ब्रिटनमध्येही भाजी आणि फळे यांचे मूल्य गगनाला भिडले असून तेथील बाजारातून टॉमेटो गायब झाले आहेत.

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी अडीच कोटी रुपये निधी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद येथे वर्ष २०२२-२३ वर्षांच्या ६ सहस्र ७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्या वेळी वरील माहिती देण्यात आली.