हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू !  

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांचे आश्वासन !

श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेले ‘हलाल जिहाद’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

वाराणसी, १ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात श्री. शुक्ला यांना माहिती दिली. यावर श्री. शुक्ला यांनी ‘याविषयाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू’ असे आश्वासन दिले. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेले ‘हलाल जिहाद’ हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले.