लंडन (ब्रिटन) – पाकिस्तान पाठोपाठ आता ब्रिटनमध्येही महागाई प्रचंड वाढली आहे. ब्रिटनमध्येही भाजी आणि फळे यांचे मूल्य गगनाला भिडले असून तेथील बाजारातून टॉमेटो गायब झाले आहेत. त्यामुळे तेथील उपाहारगृहांमध्ये टॉमेटोविनाच पास्ता आणि पिझ्झा बनवण्याची वेळ आली आहे.
आता ‘हा’ देशही पाकिस्तानच्या वाटेवर; 2 पेक्षा जास्त बटाटे, टोमॅटो खरेदीवर बंदी. भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा, सुपरमार्केटमधील शेल्फ पडली ओस #Tomato #Potato #EconomicCrisis #FoodShortage #ShortFall #AgriProducts #Vegetables #SuperMarket https://t.co/1pcJVUoHOP
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) February 24, 2023
१. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार दक्षिणी युरोप आणि उत्तरी आफ्रिका येथील वाईट वातावरणामुळे टोमॅटोच्या पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात घट झाली आहे.
२. ‘शेफ असोसिएशन’च्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये टोमॅटोच्या किमती मागच्या वर्षभरात ४ पटींनी वाढल्या आहेत. याआधी त्याची किंमत ५ पौंड, म्हणजेच ४९० रुपये प्रतीपेटी होती, जी आता वाढून २० पौंड, म्हणजेच १ सहस्र ९८० रुपये इतकी झाली आहे.