Maulana Fazl-ur-Rehman : भारत महाशक्ती बनत आहे, तर पाकिस्तान भीक मागत आहे !

पाकच्या संसदेत मौलाना (इस्लामचा अभ्यासक) फजल ऊर रहेमान याचा पाकला घरचा अहेर !

मौलाना फजल ऊर रहेमान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतासह पाकिस्तानला एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले; पण आज भारत महाशक्ती बनत आहे, तर पाकिस्तान दिवाळखोर होऊ नये, यासाठी भीक मागत आहे. पाकिस्तानविषयीचे निर्णय दुसरा कुणी तरी घेतो आणि त्यासाठी पाकिस्तानमधील राजकारण्यांना दोषी ठरवण्यात येत आहे, असा आरोप पाकिस्तानमधील ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल’ पक्षाचा नेता मौलाना फजल ऊर रहेमान याने पाकिस्तानच्या संसदेत केला. त्याच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

संपादकीय भूमिका

पाकच्या स्थितीला भारत नाही, तर स्वतः पाकचे भारतद्वेषी राजकारणी, सैन्य आणि धर्मांध जनता उत्तरदायी आहे. त्यांनी गेल्या ७५ वर्षांत जे पाप केले आहे, त्याचे फळ त्यांना आता भोगावे लागत आहे !