नक्षलवादाला घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

नक्षलवादी दलात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड आणि ओरिसा येथून तरुणांना बोलवावे लागत आहे, अशी माहिती या वेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ६ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यासमवेतच त्यांना कठोर शिक्षा लवकर देणेही अपेक्षित आहे; जेणेकरून पुन्हा कुणी कर्तव्यात कसूर करणार नाही ! – संपादक

अल्पवयीन युवतीचा विनयभंग करणार्‍या शकील शेखला ५ जिल्ह्यांतून हद्दपार करा !

इचलकरंजी येथे शकील हुसेन शेख या रिक्शाचालकाने एका अल्पवयीन युवतीला त्याच्या मालकीच्या रिक्शात बळजोरीने बसवून निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी शकील शेख याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

चेतन पगारे आणि अमन जट यांना फाशीची शिक्षा !

जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफना खून खटल्यातील मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना जिल्हा अन् सत्र न्यायाधीश अदिती कदम यांनी १६ डिसेंबर या दिवशी फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

अकोला येथे २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी जणी मैत्रिणीच्या वाढदिवसाहून परत येत होत्या. त्या वेळी ओळखीच्या मुलाने त्यांना थांबवून चॉकलेट आणि शीतपेय यातून गुंगीचे औषध दिले अन् नंतर ५ ते ६ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

पाकच्या महिला हस्तकाने संरक्षण मंत्रालयातील लिपिकाला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात : गोपनीय कागदपत्रे ‘आय.एस्.आय.’ला पाठवली

सरकारने अशांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्शाची तोडफोड !

रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न होता रिक्शातून प्रवासी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी रिक्शाची तोडफोड केली. कसबा पेठ येथील उदय शिर्के यांनी या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे.

शाईफेक प्रकरणातील तिघांवर लावलेले ३७० कलम हटवले !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणार्‍या तिघांवर ३७० कलमासह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता.

देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !

न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदीवर बंदी

हा कायदा जरी करण्यात आला, तरी जे या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, ते सिगारेट खरेदी करून या दिनांकानंतर जन्मलेल्यांना देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.