देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – महंमद जावेद नावाच्या मौलवीने मदरशामध्ये शिकणार्‍या एका १२ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. मौलवी संबंधित विद्यार्थ्याला बेशुद्ध करून हे हीन कृत्य करत असे. या मौलवीच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या मौलवी फरार आहे.

१. मुलाने मदरशातून पळ काढून घर गाठल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांना घडलेला प्रकार कळला. मौलानाने मुलाला धमकावून त्याच्यावर अनेक वेळा अत्याचार केले.

२. राजधानी देहलीतून असे वृत्त येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देहलीतील करावलनगर येथील मदिना मशिदीच्या मौलानाने ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.

३. झारखंडमध्ये १२ डिसेंबर २०२२ या दिवशी असेच एक प्रकरण समोर आले होते. तेथील एका मदरशाच्या इमामाने (मशिदीत प्रार्थना करून घेणार्‍या प्रमुखाने) ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !