प्रामाणिकपणे समाजसाहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांचा आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास येथे दिला आहे.

चिंचवड, पुणे येथील सौ. प्रीती संजय एखंडे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २०१५ मध्ये मी दुचाकीवरून प्रवास करतांना अपघात झाला होता. त्या वेळी माझ्या माकडहाडाला मार लागला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी अडीच मास पूर्णपणे झोपून रहायला सांगितले होते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आणि नामजपाचे उपाय केल्यावर मी केवळ १५ दिवसांत उठून बसू शकले.

साधकांना आईच्या मायेने घडवणार्‍या सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘पू. (सौ.) अश्विनी पवार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी सत्संग घेतात. त्या वेळी ‘ईश्वरी चैतन्य कार्यरत होऊन त्यांच्या मुखातून ईश्वरच बोलत आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘त्या सत्संगात साधक अंतर्मुख होतो’, असे मला जाणवते.

‘डोळे येणे’ या आजारावर नामजपाचे उपाय केल्याने डोळे बरे होणे

मी २ दिवस प्रतिदिन एक घंटा जप केल्यानंतर माझ्या डोळ्यांचा लालसरपणा नाहीसा झाला. माझ्या डोळ्यांतून पाणी येणे थांबले आणि डोळ्यांची खाजही ५० टक्क्यांनी न्यून झाली. गुरुमाऊलींनी मला त्यांची कृपा अनुभवण्याची संधी दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

प्रत्येक सेवा करतांना ‘ईश्वराची किंवा संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक !, सेवा करतांना प्रत्येकामध्ये ईश्वर पाहिल्यास संतसेवेचाच लाभ होईल !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि नूतनीकरण या सेवा करण्यासाठी जातांना सेवेतील अडचणी आर्ततेने प्रार्थना केल्यावर दूर होणे अन्  ही अनुभूती येण्यामागील झालेली विचारप्रक्रिया !

देवानेच आमच्यात निर्माण केलेल्या सेवा करण्याच्या तळमळीला आम्ही प्रार्थनेची जोड दिली. ईश्वर साहाय्याला धावून आला. पाऊस थांबला आणि आमच्या सेवेतील अडचण दूर झाली.

अकोला (महाराष्ट्र) येथील सौ. मंजू भुसारी यांना सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, स्वयंसूचना सत्रे करणे आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे’ यांचा आरंभ स्वतःपासूनच करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली.

सांखळी (गोवा) येथील सौ. स्वराली दवणे यांनी घरी सेवा करतांना ‘घर हा आश्रम आहे’, असा भाव ठेवून केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘मी घरी सेवा करतांना ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या वैकुंठात (परात्पर गुरु डॉ. आठवले निवास करत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) सेवा करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे मला प्रत्येक कृती करतांना आनंद होतो. मला आलेल्या अनुभूती मी गुरुचरणी अर्पण करते.

देवाने वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना सूक्ष्मातून साधनेसंदर्भात केलेले मार्गदर्शन !

‘देवाच्या अनुसंधानात असतांना त्याने मला साधनेसाठी पूरक असे विचार आणि दृष्टीकोन सुचवले. त्यातून मला साधनेमध्ये पुष्कळ साहाय्य झाले. ‘हे देवाने माझ्यासाठी केलेले मार्गदर्शनच आहे’, असे मला वाटते.