१. चांगली अनुभूती
‘आश्रमात येताक्षणीच माझे मन गदगदून गेले. भगवान श्रीकृष्णाचे मोठे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे भव्य छायाचित्र पाहून माझे मन भक्तीभावाने भरून आले.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. कोणताही पालट प्रथम स्वतःपासून करणे आवश्यक असल्याची जाणीव होणे : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, स्वयंसूचना सत्रे करणे आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे’ यांचा आरंभ स्वतःपासूनच करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली.
२ आ. कार्यशाळेत मार्गदर्शन करणार्यांचे अनेक गुण अनुभवता येणे : गुरुकृपेने आम्ही अनेक विषयांची माहिती अनेक विषयतज्ञांच्या मार्गदर्शनातून आत्मसात केली. मी स्वतः एक प्राथमिक शिक्षिका असल्याने तज्ञ मार्गदर्शकांचे उच्च विचार, भक्तीभाव, अभ्यास, व्यवहार, संयम, उत्साह, तत्परता आणि त्यांच्या चेहर्यांवरील स्थिरता इत्यादी गुण मला अनुभवता आले.
२ इ. आश्रमात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सहजतेने राबवत असल्याचे लक्षात येणे : आश्रमात आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे, प्रत्येक सत्राला वेळेवर उपस्थित रहाणे, स्वतःच्या चुका लिहिणे, स्वभावदोष लिहिणे आणि प्रायश्चित्त घेणे इत्यादी पद्धतींचे पालन लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण सहजतेने करत असल्याचे मला आढळले.
२ ई. ‘प्रत्येक कृती करतांना भगवंताला प्रार्थना करावी आणि नामजप करावा’, असे मला शिकायला मिळाले.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपली माझ्यावर अशीच कृपा सदैव राहू द्या. मला पुनःपुन्हा आश्रमात येण्याची संधी द्यावी’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. मंजू भुसारी, धर्मप्रेमी, अकोला (२४.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |