‘मी प्रत्येक शुक्रवारी श्री वैभवलक्ष्मीची प्रतिमा ठेवून तिला हळद-कुंकू वहाते. आषाढी एकादशी (१२.७.२०१९) या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता मी प्रतिसप्ताहाप्रमाणे श्री वैभवलक्ष्मीसमोर दिवा प्रज्वलित केला आणि देवीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार केला. त्या वेळी देवीच्या प्रतिमेवर वाहिलेल्या हळदी-कुंकवामध्ये ‘ॐ’चा आकार दिसत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्याचे छायाचित्र काढून आईंना (माझ्या सासूबाई आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सौ. रोहिणी ताम्हनकर यांना) दाखवले. तेव्हा त्यांनाही त्यात ‘ॐ’ दिसला.’
– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी (जुलै २०१९)