१. नामस्मरण करत असतांना स्वतःभोवती गुलाबी रंगाचे वातावरण निर्माण होऊन देहात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
‘२६.३.२०२१ या दिवशी दुपारी मी नामस्मरण करत होते. मला नामजप करतांना अकस्मात् माझ्या भोवती गुलाबी रंगाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले. काही वेळाने मला माझ्या कमरेच्या वरील भागात परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. गुलाबाच्या फुलांचा हार घातलेले आणि फेटा घातलेले परात्पर गुरु डॉक्टर मला माझ्या देहात दिसत होते. त्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. माझ्या देहाच्या वरच्या भागात मला तेच दिसत होते. माझे लक्ष नामावर पूर्णपणे केंद्रित होते.
२. पुढील दोन दिवस ‘सिंहासनावर बसलेले परात्पर गुरुदेव माझ्या हृदयात विराजमान असून ते स्मित हास्य करत आहेत’, असे दृश्य दिसणे आणि मन निर्विचार होणे
काही वेळानंतर सिंहासनावर बसलेले परात्पर गुरुदेव माझ्या हृदयात विराजमान आहेत, असे दृश्य दिसले. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर स्मित होते. त्यानंतर पुढचे दोन दिवस मला हीच अनुभूती सतत येत होती. तेव्हापासून मला सिंहासनावर बसलेले परात्पर गुरुदेव माझ्या हृदयात विराजमान असल्याचे दृश्य दिसते. ही अनुभूती येत असतांना माझे मन निर्विचार (स्थितीत) होते.’
(मी सद्गुरु सत्यवानदादांना (सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांना) ही अनुभूती सांगतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती.)
– सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), देवगड, सिंधुदुर्ग. (मार्च २०२१)